धक्कादायक! टायगर श्रॉफच्या ‘बागी2’ची कथा लीक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 15:13 IST2018-01-08T09:43:18+5:302018-01-08T15:13:18+5:30
‘बागी’च्या यशानंतर टायगर श्रॉफ आपल्या कथित गर्लफ्रेन्डसोबत ‘बागी2’ घेऊन येतो आहे. यंदाच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाबदद्ल ...

धक्कादायक! टायगर श्रॉफच्या ‘बागी2’ची कथा लीक!
‘ ागी’च्या यशानंतर टायगर श्रॉफ आपल्या कथित गर्लफ्रेन्डसोबत ‘बागी2’ घेऊन येतो आहे. यंदाच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाबदद्ल सध्या एक धक्कादायक बातमी आहे. होय, आधी ‘बागी2’मधील काही दृश्ये लीक झालीत होती. या दृश्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात टायगर अॅक्शन करताना दिसला होता. या व्हिडिओनंतर आता या चित्रपटाची अख्खी कथाचं लीक झाल्याचा दावा केला जात आहे. हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार असल्याने प्रदर्शनास अद्याप कित्येक महिने बाकी आहेत. पण त्याचआधी चित्रपटाची कथा व काही व्हिडिओ लीक झाल्याने मेकर्सला धक्का बसला आहे.
चर्चा खरी मानाल तर ‘बागी2’मध्ये टायगर श्रॉफ व त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हे दोघे प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत असतील. पण पहिल्या हाफनंतर दिशाचा मृत्यू होईल. लीक झालेल्या कथेनुसार, ‘बागी2’मध्ये टायगर व दिशाची लव्हस्टोरी कॉलेजपासून सुरु होते. पण दिशाचे टायगरऐवजी दुसºया तरूणासोबत विवाह होतो. मध्यंतरानंतर दिशाच्या पतीचा मृत्यू होतो. तिचीही हत्या होते आणि तिच्या मुलाचे अपहरण केले जाते. यानंतर टायगर या मुलाला वाचवतो.
‘बागी2’ हा ‘बागी’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसली होती. यावेळी मात्र श्रद्धाच्या जागी दिशाची वर्णी लागली आहे. ‘बागी’मध्ये टायगर श्रद्धाला वाचवताना दिसला होता. पण ‘बागी2’मध्ये तो दिशाच्या मुलाला वाचवताना दिसेल.
ALSO READ : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या बागी २ या चित्रपटातील काही दृश्य झाली लीक... दोघांना बसला आश्चर्याचा धक्का
खरे ‘बागी2’साठी श्रद्धाही उत्सूक होती. पण दिशा व टायगरची रिअल लाईफ केमिस्ट्री कॅश करण्यासाठी मेकर्सने श्रद्धाला डच्चू देत दिशाला कास्ट केले. साजिद नाडियाडवाला बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. येत्या ३० मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातही टायगर दमदार अॅक्शन करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बागी2’या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, पुणे, मनाली या ठिकाणी झाले असून काही चित्रीकरण थायलंड आणि चीनमध्ये देखील होणार आहे. तसेच काही दृश्यांच्या चित्रीकरणासाठी गोव्याला आणि लडाखचीही निवड करण्यात आली आहे.