Shocking : खोटं बोलून ‘रॅम्बो’च्या दिग्दर्शकांनी टायगर श्रॉफ अन् हृतिक रोशनला दुखावले; वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 21:13 IST2017-06-28T15:40:27+5:302017-06-28T21:13:44+5:30

काही दिवसांपूर्वीच टायगर श्रॉफ याच्या आगामी ‘रॅम्बो’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पोस्टरमध्ये टायगर खूपच धाकड ...

Shocking: By saying false 'rambo' directors hurt Tiger Shroff and Hrithik Roshan; Read detailed! | Shocking : खोटं बोलून ‘रॅम्बो’च्या दिग्दर्शकांनी टायगर श्रॉफ अन् हृतिक रोशनला दुखावले; वाचा सविस्तर!

Shocking : खोटं बोलून ‘रॅम्बो’च्या दिग्दर्शकांनी टायगर श्रॉफ अन् हृतिक रोशनला दुखावले; वाचा सविस्तर!

ही दिवसांपूर्वीच टायगर श्रॉफ याच्या आगामी ‘रॅम्बो’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पोस्टरमध्ये टायगर खूपच धाकड अवतारात बघावयास मिळत होता. त्याच्या या पोस्टरला चाहत्यांकडून प्रचंड पसंतीही मिळाली होती. असे म्हटले जात होते की, टायगरच्या या चित्रपटात आतापर्यंत एकाही बॉलिवूडपटात बघितली नसेल अशी अ‍ॅक्शन बघावयास मिळणार आहे. सुरुवातीला या चित्रपटासाठी हृतिक रोशन पहिली पसंती असल्याचे बोलले जात होते, मात्र हृतिकने नकार दिल्यानेच टायगरची याठिकाणी वर्णी लागली; मात्र आता येत असलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी यावर खुलासा केला असून, अशाप्रकारच्या बातम्या पूर्णत: खोट्या असल्याचे म्हटले आहे. 

याविषयी बोलताना सिद्धार्थने म्हटले की, ‘ही बातमी खोटी आहे. कारण ‘रॅम्बो’करिता सुरुवातीपासूनच टायगरच पहिली पसंती होता; मात्र सिद्धार्थचे हे वक्तव्य जेव्हा डीएनएमध्ये प्रसिद्ध करण्यात आले तेव्हा सिद्धार्थ आनंद खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डीएनएच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आनंद सर्वात अगोदर हृतिक रोशनकडे या चित्रपटाचे प्रपोजल घेऊन गेले होते; मात्र हृतिकने चित्रपटात काम करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. 

त्यानंतरही सिद्धार्थ आणि हृतिकच्या भेटी झाल्या परंतु हृतिक आपल्या नकारावर कायम असल्याने टायगरचा याकरिता विचार करण्यात आला. वास्तविक हृतिकचा नकार देण्याचे कारण म्हणजे त्याच्या प्रोजेक्टच्या डेट्स अगोदरच निश्चित असल्याने त्याला ‘रॅम्बो’साठी वेळ देणे अशक्य होते. त्यानंतर आनंदने टायगरबरोबर या चित्रपटाविषयी चर्चा केली. टायगरने त्यास लगेचच होकार दिला. परंतु आता सिद्धार्थ हृतिकबरोबर या भूमिकेसाठी कधी चर्चा करीत नसल्याचे म्हणत असल्याने ते खोटं का बोलत असावेत? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. 

वास्तविक जेव्हा टायगरचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते तेव्हा सगळ्यांनीच त्याचे कौतुक करीत योग्य कास्टिंग केली असल्याचे म्हटले होते. कारण टायगरचे अ‍ॅक्शन स्किल्स जबरदस्त असून, अन्य कलाकारांमध्ये ते स्किल्स बघावयास मिळत नाहीत; मात्र हृतिकची जर टायगरसोबत तुलना केली तर त्यामध्ये हृतिक उजवा ठरेल हेही तेवढेच खरे आहे. दरम्यान चित्रपट निर्माते असा दावा करीत आहेत की, हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीचा असेल. आता ही बाब चित्रपट रिलीज झाल्यानंतरच समजणार असून, टायगर त्यात कितपत यशस्वी ठरेल हेही स्पष्ट होईल. 

Web Title: Shocking: By saying false 'rambo' directors hurt Tiger Shroff and Hrithik Roshan; Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.