धक्कादायक ! लता मंगेशकर यांच्यावर केला होता प्राणघातक हल्ला, आवाज गमावण्याची आली होती वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 06:00 IST2019-09-01T06:00:00+5:302019-09-01T06:00:00+5:30
लता मंगेशकर यांच्या जेवणात विष मिसळून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

धक्कादायक ! लता मंगेशकर यांच्यावर केला होता प्राणघातक हल्ला, आवाज गमावण्याची आली होती वेळ
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी प्रसिद्ध संगीतकार व गायकांसोबत काम केलं आहे. एक वेळ अशी आली होती जेव्हा लता मंगेशकर यशाच्या शिखरावर असताना कुणीतरी त्यांच्या जेवणात विष मिसळले होते.
ही घटना आहे १९६२ सालची. त्यावेळी लता मंगेळकर यांना जेवणातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. १९६२ साली बीस साल बाद चित्रपटासाठी लता दीदींना गाणं रेकॉर्डिंग करायचं होतं. ज्यासाठी संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र रेकॉर्डिंगच्या काही तासांपूर्वी लता दीदींची तब्येत बिघडली होती.
डॉक्टरांना बोलवून त्यांचं चेकअप केलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, लता मंगेशकर यांच्या जेवणात स्लो पॉइजन मिसळवले होते. त्यानंतर त्यांची बहिण उषा मंगेशकर यांनी स्वतः जेवण बनवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्या हिंमत नाही हरल्या आणि गायन जगतात पुन्हा कमबॅक केलं. म्हटलं जातं की, लता दीदी जवळपास तीन महिने आजारी होत्या. त्यावेळी त्यांना आवाज गमावण्याचीही भीती होती.
या कठीण समयी त्यांना लेखक मजरूह सुल्तानपुरी यांनी साथ दिली होती.
लता मंगेशकर यांचा जन्म मध्यप्रदेशमधील इंदौर शहरातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात झाला आहे. सुरूवातीला त्यांना खेळात आणि संगीतमध्ये रस होता. असंही म्हटलं जातं की लता दीदी क्रिकेटच्या चाहत्या आहेत की त्यांची लॉर्ड्सच्या क्रिकेट पटांगणात सामन्यांमध्ये त्यांची एक सीट बुक असायची.
लता मंगेशकर यांनी त्यांच्या काळात सर्व गायक व म्युझिक कंपोझर्ससोबत काम करायला सुरूवात केली होती. १९६३ साली सी. रामचंद्र यांनी कंपोझ केलेलं गाणं जे लता दीदींनी २६ जानेवारी, १९६३ साली दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं गायलं होतं आणि हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं.
हे गाणं आजही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी ऐकायला मिळतं.