Shocking : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे केले अपहरण; अश्लील व्हिडीओ अन् फोटोही काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 15:11 IST2017-02-18T09:41:00+5:302017-02-18T15:11:00+5:30

साउथ इंडियन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भावना हिला एका भयानक प्रसंगाचा सामना करावा लागला. शूटिंग संपून रात्री उशिरा घरी परतणाºया ...

Shocking: 'This' kidnapping done by the famous actress; Porn videos and photos are also removed | Shocking : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे केले अपहरण; अश्लील व्हिडीओ अन् फोटोही काढले

Shocking : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे केले अपहरण; अश्लील व्हिडीओ अन् फोटोही काढले

उथ इंडियन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भावना हिला एका भयानक प्रसंगाचा सामना करावा लागला. शूटिंग संपून रात्री उशिरा घरी परतणाºया भावनाचे अचानक काही चोरट्यांनी अपहरण करून तिचे अश्लील फोटो अन् व्हिडीओ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी केरळ पोलिसांनी एक अपहरणकर्त्याला अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 



त्याचे झाले असे की, गेल्या शुक्रवारच्या रात्री भावना शूटिंग पूर्ण करून घरी परतत होती. तेव्हा दोघा अपहरणकर्त्यांनी अथानी परिसरात रस्त्याच्या मध्येच कार अडवून तिचे अपहरण केले. रात्री सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे भावना चांगलीच घाबरून गेली आहे. या अपहरणकर्त्यांनी भावनाला घटनेच्या ठिकाणापासून तब्बल २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पलारीवट्टम या भागात नेले. तब्बल १ तास तिला कारमध्येच डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी अपहरणकर्त्यांनी तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. तिचे काही फोटो अन् अश्लील व्हिडीओ यावेळी शूट केला. त्यानंतर तिला घराजवळ सोडण्यात आले. 



अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या भावनाने लगेचच तिच्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला फोन करून घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी लगेचच याविषयी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी आपली सूत्रे फिरवित काही तासांतच या घटनेतील एका गुन्हेगाराला अटक केली आहे. भावनाने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात तिचा पहिला ड्रायव्हर मार्टिन हा सहभागी होता. पोलिसांनी मार्टिनला अटक केली असून, सुनील नावाचा दुसरा आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे. पोलिसांनी या दोघांवरही लैंगिक शोषण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. 



सध्या पोलीस भावनाचे फोटो आणि व्हिडीओ मिळवण्याच्या तयारीत असून, लवकरच घटनेतील दुसरा आरोपी गजाआड करणार असल्याचे समजते. दुसºया आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी काही पथके तयार केली असून, राज्याच्या कानाकोपºयात पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. भावना मल्याळम इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात असून, तिने आतापर्यंत ७५ पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलेले आहे. भावनासोबत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: Shocking: 'This' kidnapping done by the famous actress; Porn videos and photos are also removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.