SHOCKING: कंगना राणौतने केली करण जोहरची बोलती बंद; वशिलेबाजीचा केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 11:50 IST2017-02-11T06:20:58+5:302017-02-11T11:50:58+5:30

नुकतेच गोविंदाने करण जोहरवर निवडक कलाकारांना प्रधान्य देणाचा आरोप केला होता. इंडस्ट्रीमध्ये केवळ वशिलेबाजी आणि गटा-तटाचे राजकारण चालते असे ...

Shocking: Kangana Ranaut has stopped talking to Johar; Allegations of vandalism | SHOCKING: कंगना राणौतने केली करण जोहरची बोलती बंद; वशिलेबाजीचा केला आरोप

SHOCKING: कंगना राणौतने केली करण जोहरची बोलती बंद; वशिलेबाजीचा केला आरोप

कतेच गोविंदाने करण जोहरवर निवडक कलाकारांना प्रधान्य देणाचा आरोप केला होता. इंडस्ट्रीमध्ये केवळ वशिलेबाजी आणि गटा-तटाचे राजकारण चालते असे तो म्हणाला होता. आता वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणौतसुद्धा बॉलीवूडच्या दुटप्पीपणाचा चेहरामोहरा सर्वांसमोर आणण्याचे प्रयत्न करीत आहे.

‘रंगून’ सिनेमातील सहकलाकार सैफ अली खान व शाहीद कपूरसोबत ती करण जोहरचा कॉन्ट्रोव्हर्शियल चॅट शो ‘कॉफी विथ करण’ वर सहभागी होणार आहे. अद्याप टेलिकास्ट न झालेल्या या भागात ती करण जोहरला चांगलेच फै लावर घेताना दिसणार अशी माहिती मिळतेय.

ALSO READ: करण जोहर तर डेव्हिड धवनपेक्षाही जळकुटा माणूस : गोविंदा

मनात येईल ते बिनदिक्कत बोलून मोकळी होणाऱ्या कंगनाने शोचा होस्ट करणवर वशिलेबाजीचा आरोप करत म्हटले की, ‘मी जेव्हा माझे आत्मचरित्र प्रकाशित करेन, त्यामध्ये ‘बॉलीवूडमधील वशिलेबाजी’ असे एक स्पेशल प्रकरण असेल जे करणने लिहिलेले असेल.’

आलेल्या पाहुण्यांना गोत्यात आणणारे प्रश्न विचारणऱ्या करणला मात्र कंगनाला काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते. अखेर त्याच्या शोवर त्यालाच गप्प करणारा गेस्ट त्याला भेटला. या भागाचे वैशिष्ट्ये म्हणजे करिनाचा पती सैफ आणि करिनाचा एक्स-बॉयफे्रेंड शाहीद प्रथमच एकत्र चॅट शोवर आले.

ALSO READ:हृतिकने माझे करिअर संपवण्यासाठी सगळे प्रयत्न केलेत : कंगना राणौत

सुत्रांनुसार, दोघे एकमेकांच्या उपस्थित अत्यंत कम्फर्टेबल होते. जेव्हा करणने त्यांना विचारले की, करिनासोबत इतिहास पाहता दोघांना एकमेकांसोबत शूटींग करणे अवघड गेले का? यावर ते सैफ म्हणाला की, बिल्कूल नाही. सुरूवातील आम्ही मुलांबद्दल बोललो. मी ‘मिशा’बद्दल विचारले त्याने तैमुरची चौकशी केली आणि आमची मैत्री झाली.

मध्यंतरी कंगना आणि सैफ-शाहीद यांचे बिनसले असल्याचे वृत्त होते. तिच्या स्पष्टोक्तेपणामुळे दोघेही तिच्यापासून अंतर राखूनच होते. कंगनानेसुद्धा बॉलीवूडमध्ये कोणीच कोणाचे खरे मित्र नाही असे उघड-उघउ सांगितले. आता एवढे सगळे झाले असताना हा एपिसोड एकदम हॉट आणि स्पाईसी असेल यात काही शंका नाही.

Web Title: Shocking: Kangana Ranaut has stopped talking to Johar; Allegations of vandalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.