हिना खानचा धक्कादायक खुलासा!, टिव्हीवरील कलाकारांना बॉलिवूडमध्ये करावा लागतो या गोष्टींचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 14:25 IST2020-02-07T14:24:49+5:302020-02-07T14:25:38+5:30

हिना खानचा हॅक्ड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Shocking! Hina Khan says that there is class system in bollywood | हिना खानचा धक्कादायक खुलासा!, टिव्हीवरील कलाकारांना बॉलिवूडमध्ये करावा लागतो या गोष्टींचा सामना

हिना खानचा धक्कादायक खुलासा!, टिव्हीवरील कलाकारांना बॉलिवूडमध्ये करावा लागतो या गोष्टींचा सामना


हिना खान तिचा आगामी चित्रपट हॅक्डमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन्सदरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीशी निगडीत काही गोष्टींचा खुलासा केला. हिनाने पीटीआईला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, टीव्ही अॅक्ट्रेस असल्यामुळे तिला सिनेइंडस्ट्रीतील सिस्टमला सामोरे जावे लागले. 

हिना म्हणाली की, टीव्ही अभिनेत्री असल्यामुळे मोठे प्रोडक्शन बॅनर्स व मोठे डिझायनर्स काम करायला पाहत नाहीत. टीव्ही कलाकार कितीही टॅलेंटेड असले तरी त्यांना चित्रपटसृष्टीतील लोक त्यांना संधी देत नाहीत.


हिनाने सांगितले की, एका चित्रपटातून मला किती लोकप्रियता मिळेल हे सांगणे कठीण आहे. टीव्ही अॅक्टरचा टॅगची इमेज काही ठिकाणी निगेटिव्ह ठरेल. लोक मला सांगतात की तू टीव्ही एक्टर आहे, तू ही भूमिका नीट साकारू शकत नाही.


हिना खान ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून घराघरात पोहचली. तिला या मालिकेतील अक्षराच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यानंतर ती काही मालिकांमध्ये दिसली आणि आता ती विक्रम भट यांच्या हॅक्ड चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत रोहन शाह, मोहित मल्होत्रा आणि सिद्धार्थ मक्कर यांच्यासारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Web Title: Shocking! Hina Khan says that there is class system in bollywood