shocking: फरहा खानने शिरिष कुंदरसोबत लग्न करण्याआधी तिच्या आयुष्यात आला होता हा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 11:02 IST2017-06-20T05:32:22+5:302017-06-20T11:02:22+5:30
फरहा खानने 2004मध्ये शिरिष कुंदरसोबत लग्न केले. मैं हूँ ना या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते तर या ...

shocking: फरहा खानने शिरिष कुंदरसोबत लग्न करण्याआधी तिच्या आयुष्यात आला होता हा अभिनेता
फ हा खानने 2004मध्ये शिरिष कुंदरसोबत लग्न केले. मैं हूँ ना या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते तर या चित्रपटाची एडिटिंग शिरिष कुंदरने केली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची ओळख झाली आणि नंतर त्यांनी लग्न केले. शिरिष फरहापेक्षा वयाने खूपच लहान आहे. त्या दोघांमध्ये जवळजवळ आठ वर्षांचे अंतर आहे. त्या दोघांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.
फरहाच्या आयुष्यात शिरिष येण्याआधी फरहा एका अभिनेत्याला डेट करत होती. फरहा कोणाला डेट करत होती हे तुम्हाला कळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. फरहा आणि आकाशदीप सेहगल अनेक वर्षं नात्यात होते. आकाशदीप मॉडलिंग करत असताना त्याची आणि फरहाची ओळख झाली होती.
आकाशदीप सेहगल हे छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत त्याने साकारलेली अंश विरानी ही भूमिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तो झलक दिखला जा, बिग बॉस यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये झळकला आहे. त्याने प्यार में कभी कभी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
आकाशदीप आणि फरहा जवळजवळ दोन वर्षं नात्यात होते. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. झलक दिखला जा या कार्यक्रमात फरहा परीक्षकाच्या भूमिकेत असताना आकाशदीप त्यात स्पर्धक म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. पण त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे फरहाने त्याला कार्यक्रमातून आऊट केले असा आरोप आकाशदीपने फरहावर लावला होता.