धक्कादायक अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या की अपघात ? मृत्युचे गुढ अजूनही कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 17:03 IST2020-06-10T16:58:12+5:302020-06-10T17:03:18+5:30
नशेत असताना 1 वाजता खिडकीतून तोल जाऊन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

धक्कादायक अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या की अपघात ? मृत्युचे गुढ अजूनही कायम
दिशा बॉलिवूडमध्ये पब्लिक रिलेशन मॅनेजर होती. सुशांत सिंग राजपूतशिवाय तिने रिहा चक्रवर्तीसह अनेक कलाकारांसोबत काम केले होते.मात्र निशाच्या मृत्यूने अनेकांना धक्काच बसला आहे. दिशाचा मृत्यू सुरुवातीला आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे चर्चा होती. मात्र आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिशाचा दारूच्या नशेत तोल गेला आणि तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार दिशा सोमवारी ती तिच्या काही फ्रेंड्ससोबत मलाड येथे आली होती. या ठिकाणी हे सर्वजण 12 व्या मजल्यावर अभिनेता रोहन रॉयच्या फ्लॅटवर जमले होते.रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण दारू पित होते. दिशा सुद्धा नशेत होती आणि अशाच अवस्थेती ती खिडकीच्या जवळ गेली. नशेत असताना 1 वाजता खिडकीतून तोल जाऊन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.
ही घटना घडली तेव्हा तिच्याबरोबर अनेक मित्र मंडळी उपस्थि होते. त्यामुळे त्यांचे स्टेटंमेंटही अजुन बाकी आहेत. तसेच नेमके ही आत्महत्या आहे की आणखीन काही? यावर सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. तुर्तास निशाच्या मृत्युचे गुढ अजुनही कायम आहे.