shocking !! धनुषने माझे लैंगिक शोषण केले, गायिका सुचित्रा कार्तिक हिचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 15:15 IST2017-03-05T09:40:39+5:302017-03-05T15:15:16+5:30

सुपरस्टार रजनीकांत याचा जावई धनुष पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. धनुष हा आपला हरवलेला मुलगा आहे, असा दावा एका ...

shocking !! Dhanush had sexually assaulted me, serious allegation of singer Suchitra Kartik | shocking !! धनुषने माझे लैंगिक शोषण केले, गायिका सुचित्रा कार्तिक हिचा गंभीर आरोप

shocking !! धनुषने माझे लैंगिक शोषण केले, गायिका सुचित्रा कार्तिक हिचा गंभीर आरोप

परस्टार रजनीकांत याचा जावई धनुष पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. धनुष हा आपला हरवलेला मुलगा आहे, असा दावा एका वृद्ध दांम्पत्याने केला आहे.  यामुळे धनुषला कोर्टाच्या खेटा घालाव्या लागत आहेत. त्यातच आता त्याच्यावर एका प्रसिद्ध गायिकेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
प्रसिद्ध गायिका आणि टीव्ही होस्ट सुचित्रा कार्तिक हिने धनुषवर हा आरोप ठेवला आहे. केवळ धनुषच नाही तर अभिनेता अनिरूद्ध आणि दक्षिणेतील मोठ्या स्टार्सवर तिने हा आरोप ठेवला आहे. धनुष आणि अनिरुद्ध  या दोघांनी मला फक्त ड्रग्सच दिले नाही, तर माझे लैंगिक शोषणही केले, असा खळबळजनक आरोप तिने केला आहे.





आधी सुचित्राने धनुष आणि अनिरूद्धसोबतचे काही आपत्तीजनक फोटो पोस्ट केलेत. यानंतर धनुष आणि अन्य कलाकारांच्या चाहत्यांनी सुचित्राला चांगलेच फैलावर घेतले. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर सुचित्राने टिष्ट्वटरवर एक पोस्ट टाकली. यात तिने हा गंभीर आरोप केला. धनुषच्या चाहत्यांकडून मी ट्रोल होत आहे. पण या चाहत्यांच्या हिरोने माझ्यासोबत काय केले ते पाहा, असे लिहित तिने एक फोटो पोस्ट केला. या फोटोत सुचित्राच्या हातावर जखम दिसतेय. सुचित्राच्या हातावरची ही जखम खूप काही सांगणारी असली तरी काही वेळातच तिचा हा फोटो अन् सगळ्या पोस्ट डिलिट करण्यात आल्या. यानंतर काही वेळात सुचित्राचे अकाऊंट हॅक झाल्याची बातमी आली.



  मीडियाने याबाबत सुचित्राला विचारले असता, तिने मात्र अकाऊंट हॅक झाल्याचा इन्कार केला. माझे अकाऊंट हॅक वगैरे झालेले नव्हते. मी स्वत: त्या पोस्ट केल्यात, असे ती म्हणाली. मात्र सुचित्राच्या पतीने मात्र वेगळीच स्टोरी सांगितली. तिच्या पतीने या संपूर्ण प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली. शिवाय सुचित्राचे अकाऊंट खरोखरच हॅक झाले होते. ती सध्या डिप्रेशनमध्ये आहे, असे त्याने स्पष्ट केले. आता सुचित्रा खरी बोलतेय की तिचा पती, हे कळायला मार्ग नाही. पण या एकूणच प्रकरणाने चांगलीच खळबळ उडवून दिलीय, हे मात्र नक्की.
 

Web Title: shocking !! Dhanush had sexually assaulted me, serious allegation of singer Suchitra Kartik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.