Shocking : ‘बाहुबली २’चा ट्रेलर रिलिज होण्याअगोदरच झाला होता लिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 19:44 IST2017-03-16T14:11:21+5:302017-03-16T19:44:57+5:30

एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित ‘बाहुबली : द कन्क्ल्यूजन’चा ट्रेलर गुरुवारी अधिकृतरीत्या रिलिज करण्यात आला आहे; मात्र ट्रेलर रिलिज करण्याच्या काही तास अगोदरच आॅनलाइन लिक झाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Shocking: 'Bahubali 2' trailer had been released before it was released! | Shocking : ‘बाहुबली २’चा ट्रेलर रिलिज होण्याअगोदरच झाला होता लिक!

Shocking : ‘बाहुबली २’चा ट्रेलर रिलिज होण्याअगोदरच झाला होता लिक!

. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित ‘बाहुबली : द कन्क्ल्यूजन’चा ट्रेलर गुरुवारी अधिकृतरीत्या रिलिज करण्यात आला आहे; मात्र ट्रेलर रिलिज करण्याच्या काही तास अगोदरच आॅनलाइन लिक झाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमध्ये आॅनलाइन लिक होण्याचे प्रमाण वाढले असल्याने आता सिनेमा आॅनलाइन लिक होऊ नये याबाबतची बाहुबलीच्या निर्मात्यांकडून प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. तसेच यामुळे निर्मात्यांच्या चिंतेतही भर पडली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या ‘बाहुबली-२’चा ट्रेलर रिलिज झाला अन् प्रेक्षकांसह मनोरंजन जगतातील मंडळींनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले. काहीनी तर याच ‘मास्टरपिस’ असे नाव दिले. सोशल मीडियावर तर हे ट्रेलर वाºयासारखे व्हायरल झाले. परंतु अधिकृतरीत्या ट्रेलर रिलिज होण्याअगोदरच त्याचे तामिळ व्हर्जन आॅनलाइन लिक झाल्याने निर्मात्यांना नाइलाजास्तव वेळेच्या आधीच सर्व भाषांमध्ये हे ट्रेलर रिलिज करावे लागले. 



२ मिनिट २० सेकंदाच्या या ट्रेलरने सध्या सगळीकडेच धूम उडवून दिली आहे. परंतु अगोदरच आॅनलाइन लिक झाल्याने निर्मात्यांना चिंता लागली आहे. आता या सिनेमाच्या रिलिजविषयी प्रचंड काळजी घेतली जात असून, इतर बॉलिवूडपटांप्रमाणे हा ब्लॉकबास्टर सिनेमा आॅनलाइन लिक होऊ नये याची चिंता आता निर्मात्यांना भेडसावत आहे. तसेच याविषयी खबरदारी म्हणून पुरेशा उपाययोजनादेखील केल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, ट्रेलरच्या धमाकेदार एंट्रीनंतर आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या रिलिजची आतुरता लागली आहे. गुरुवारी सिनेमाविषयी घोषणा करताना सांगण्यात आले की, ‘बाहुबली : द कन्क्ल्यूजन’ हा सिनेमा येत्या २८ एप्रिल रोजी सिनेमागृहांमध्ये बघावयास मिळणार आहे. तेलगू, तामिळ, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये हा सिनेमा रिलिज केला जाणार आहे. 

Web Title: Shocking: 'Bahubali 2' trailer had been released before it was released!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.