Shocking!​ आराध्या झाली ट्रोल! युजरच्या प्रश्नाने भडकला अभिषेक बच्चन !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 12:47 IST2017-12-06T05:01:22+5:302017-12-06T12:47:36+5:30

सोशल मीडियावर ट्रोल होणे बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवे नाही. पण आता ट्रोलिंग या शब्दांचा अर्थही माहित नसलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या चिमुकल्या ...

Shocking! Aaradhha troll! Abhishek Bachchan on the question of user! | Shocking!​ आराध्या झाली ट्रोल! युजरच्या प्रश्नाने भडकला अभिषेक बच्चन !!

Shocking!​ आराध्या झाली ट्रोल! युजरच्या प्रश्नाने भडकला अभिषेक बच्चन !!

शल मीडियावर ट्रोल होणे बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवे नाही. पण आता ट्रोलिंग या शब्दांचा अर्थही माहित नसलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या चिमुकल्या मुलांनाही ट्रोल केले जात आहे. होय, यावेळी ट्रोलर्सने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघांची मुलगी आराध्या हिला ट्रोल केले आहे. मुलीला लक्ष्य करणे कुण्या बापाला आवडेल? त्यामुळे आराध्याला ट्रोल होताना पाहून अभिषेकचे माथे ठणकले.मग त्याने आराध्याला ट्रोल करणाºया संबंधित युजरला चांगलेच सुनावले.



आराध्या सतत ऐश्वर्यासोबत दिसते. मग तो कान्सचा सोहळा असो, कुठलाही इव्हेंट असो वा कुठलाही खासगी कार्यक्रम. अलीकडे संपूर्ण बच्चन कुटुंब मेंगळुरू येथे एका लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. त्याचे फोटो अद्यापही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून शेरीएन पेटाडीन नामक युजरने आराध्याला लक्ष्य केले.


‘ज्युनिअर बच्चन, तुझी मुलगी शाळेत जात नाही का? तुझ्या मुलीला सतत आईसोबत ट्रिपवर जाण्यासाठी शाळा परवानगी देते तरी कशी, याचेच मला आश्चर्य वाटते. तुम्ही तिला ‘ब्युटी विदआऊट ब्रेन’ तर बनवत नाहीयेत ना  ? गर्विष्ठ आईसोबत सतत हातात हात घालूनच ती दिसते.आराध्याचे सामान्य बालपण हरवले आहे,’ असे या युजरने लिहिले. आता असे Tweet वाचून कुणाचे माथे ठणकणार नाही. अभिषेकचेही तेच झाले. त्याने आराध्याला लक्ष्य करणाºया या युजरला तिच्याच शब्दांत सुनावले. ‘मॅम, माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश शाळा वीकएंडला बंद असतात. ती वीक डेजलाच शाळेत जाते. माझ्यामते, तुम्हाला Tweet करण्याआधी विचार करायला हवा होता,’ असे अभिषेकने लिहिले.


ALSO READ : ​आजी जया बच्चन यांच्यासोबत कधीच का दिसत नाही आराध्या बच्चन?

अभिषेकचे Tweet खिलाडू वृत्तीने घेत, संबंधित युजरने रिप्लाय दिल्याबद्दल अभिषेकचे आभार मानलेत. अर्थात हे आभार मानताना अभिषेक व ऐश्वर्याला एक सल्लाही या युजरने दिला. ‘मी जे लिहिले, तसाच विचार अनेकजण करतात. पण बोलायला घाबरतात. आपल्या मुलीचे कायम आईसोबतचे फोटो पोस्ट करण्याऐवजी तुम्ही लोकांनी तिचे आणखीही काही सामान्य मुलांसारखे फोटो पोस्ट करायला हवेत’, असे या युजरने लिहिले. आता या युजरचा सल्ला ऐश्वर्या व अभिषेक किती मनावर घेतात, ते बघूच!!

Web Title: Shocking! Aaradhha troll! Abhishek Bachchan on the question of user!