"त्याच्या अफेअर्सला सानिया कंटाळली होती", तिसरं लग्न केल्यानंतर शोएबच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 15:55 IST2024-01-21T15:55:28+5:302024-01-21T15:55:59+5:30
शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटावर क्रिकेटरच्या बहिणीची प्रतिक्रिया, म्हणाली...

"त्याच्या अफेअर्सला सानिया कंटाळली होती", तिसरं लग्न केल्यानंतर शोएबच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सानियाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने तिसऱ्यांदा नव्याने संसार थाटला आहे. शोएबने शनिवारी(२० जानेवारी) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी निकाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शोएब आणि सानिया घटस्फोट घेणार असल्याच्या सुरू असतानाच शोएबने तिसरं लग्न केल्याचं समोर आलं.
पण, शोएबच्या या लग्नासाठी कुटुंबीयांचाही नकार असल्याचं समोर आलं आहे. शोएब आणि सनाच्या लग्नातही क्रिकेटरचे कुटुंबीय सहभागी झालेले नसल्याचं वृत्त आहे. शोएबच्या या लग्नामुळे त्याचे कुटुंबीय नाराज असल्याची माहिती एका पाकिस्तानी वेबसाईटने दिली आहे. तर झुम टीव्हीशी बोलताना शोएबच्या बहिणीने त्याच्या आणि सानियाच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. "शोएबच्या विवाहबाह्य संबंधाना(extramarital affairs) कंटाळून सानियाने घटस्फोट घेतला", असा धक्कादायक खुलासा शोएबच्या बहिणीने केला आहे.
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच सानियाने एक क्रिप्टिक पोस्टही शेअर केली होती. पण, शोएब आणि सानियाने खरंच घटस्फोट घेतला का? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. सानियाने शोएबपासून खुला घेतल्याचा खुलासा तिच्या वडिलांनी केला आहे. सध्या सानिया तिच्या लेकासोबत भारतात आहे.
सानिया आणि शोएबने २०१० साली लग्न केलं होतं. हे शोएबचं दुसरं लग्न होतं. सानियाआधी त्याने आयशा सिद्दीकीसोबत निकाह केला होता. आता शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या सना जावेदशी निकाह करत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे.