दिलीप कुमार यांची नात सायशाने पतीसोबत शेअर केला रोमॅन्टिक फोटो, आता होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 11:25 IST2020-12-24T11:23:33+5:302020-12-24T11:25:05+5:30

सायशाने पतीसोबत डान्स करतानाचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.

shivaay fame actress sayyeshaa shares romantic picture with husband arya but brutally trolled for age gap | दिलीप कुमार यांची नात सायशाने पतीसोबत शेअर केला रोमॅन्टिक फोटो, आता होतेय ट्रोल

दिलीप कुमार यांची नात सायशाने पतीसोबत शेअर केला रोमॅन्टिक फोटो, आता होतेय ट्रोल

ठळक मुद्देदाक्षिणात्य सिनेसृष्टीत आर्या  हा प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनयासोबतच तो एक उत्तम उद्योगपती आहे. 

दिलीप कुमार यांची नात सायशा सेहगल हिला ओळखत असालच. होय, अजय देवगणच्या ‘शिवाय’ या सिनेमातून डेब्यू करणारी तिच अभिनेत्री. तर ही सायशा सध्या जबरदस्त ट्रोल होतेय. सायशाने पतीसोबत डान्स करतानाचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. कारण काय तर सायशा व तिच्या पतीमधील वयातील फरक़
गेल्यावर्षी  सायशाने साऊथचा अभिनेता आर्याशी लग्न केले आहे. आर्या सायशापेक्षा 17 वर्षांनी मोठा आहे.  त्यावेळीही लोकांनी सायशाला प्रचंड ट्रोल केले होते. नुकताच सायेशाने तिचा  आर्याबरोबर एक फोटो शेअर केला आहे. मात्र, तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे तिला जोरदार ट्रोल केले गेले.

या फोटोत दोघांनीही एकमेकांचा हात धरला आहे.‘डान्सिंग विद माय लव्ह’ असे फोटो शेअर करताना सायेशाने लिहिले आहे. हा फोटो पाहताच काही युजर्सनी सायशाला ट्रोल करणे सुरु केले. एका युजरने  ‘वडील आणि मुलगी’ लिहित दोघांना ट्रोल केले.   अनेक ट्रोलर्सनी सायशाच्या या पोस्टवर अश्लील कमेंट केल्या. याच्यासोबत हिने लग्न केलेच कसे?असे काही ट्रोलर्सनी लिहिले.

सायेशा ही सायरा बानोची भाची शाहीनची मुलगी आहे.  सायशाने 10 मार्च 2019 मध्ये आर्यासोबत ती विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. त्या दोघांमध्ये जवळजवळ १७ वर्षांचा फरक आहे. ‘गजनीकांत’ या साऊथ चित्रपटात आर्या आणि सायशा यांनी एकत्र काम केले होते.

याच चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आर्या  हा प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनयासोबतच तो एक उत्तम उद्योगपती आहे. चेन्नईतील ‘शी सेल’ हॉटेलचा  तो मालक आहे. यासोबतच त्याची ‘द शी पीपल’नावाने प्रोडक्शन कंपनी आहे. या कंपनीनुसार तो न्यू टॅलेंटला पुढे जाण्याची संधी देतो.  आर्याने   कलभा कधलन,  माय कन्नाडी, सर्वम, राजा रानी,  जीवा सोबतच अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. 

Web Title: shivaay fame actress sayyeshaa shares romantic picture with husband arya but brutally trolled for age gap