शिल्पा करणार योगाचा प्रसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:38 IST2016-05-24T10:08:34+5:302016-05-24T15:38:34+5:30
अभिनेत्री, उद्योजिका शिल्पा शेट्टीने माद्रिद येथे होणाºया इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (आयफा) २०१६ च्या सोहळ्यात योगाचा प्रसार करण्याचे ठरविले ...

शिल्पा करणार योगाचा प्रसार
अ िनेत्री, उद्योजिका शिल्पा शेट्टीने माद्रिद येथे होणाºया इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (आयफा) २०१६ च्या सोहळ्यात योगाचा प्रसार करण्याचे ठरविले आहे. शिल्पा शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत अग्रेसर आहे. ‘आम्ही माद्रिद येथे योगाचा कार्यक्रम ठेवला आहे. यापूर्वी आम्ही दुबईमध्ये कार्यक्रम केला होता, त्याला खूप प्रतिसाद मिळाला. मला वाटतं की हा चांगला प्लॅटफॉर्म आहे’ असे शिल्पा म्हणाली.
दरवर्षी आयफा नवीन काही तरी करण्याचा प्रयत्न करीत असते. बॉलीवूड आणि योगा यांचे मिश्रण यानिमित्ताने होते आहे. मी याच्याशी जोडली गेली असल्याचा मला आनंद होतो. मी स्पेनमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचे शिल्पाने पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. २३ ते २६ जून दरम्यान आयफाचा कार्यक्रम होतो आहे. फरहान अख्तर आणि शाहीद कपूर याचे सूत्रसंचालन करणार आहेत. सलमान खान, हृतिक रोशन, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोन, सोनाक्षी सिन्हा आणि टायगर श्रॉफ हे कार्यक्रम सादर करणार आहेत.