शिल्पा शिकतेयं, एरिअल योगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 16:35 IST2016-07-18T11:05:33+5:302016-07-18T16:35:33+5:30
अभिनेत्री, बिझनसवूमन आणि लेखिका (‘दी ग्रेट इंडियन डाएट’ हे तिचे पुस्तक बेस्ट सेलर ठरले)अशी ओळख असलेली शिल्पा शेट्टी कुंद्रा ...

शिल्पा शिकतेयं, एरिअल योगा!
अ िनेत्री, बिझनसवूमन आणि लेखिका (‘दी ग्रेट इंडियन डाएट’ हे तिचे पुस्तक बेस्ट सेलर ठरले)अशी ओळख असलेली शिल्पा शेट्टी कुंद्रा ही फिटनेसच्या बाबतीत अगदी काटेकोर आहे, हे तुम्ही जाणताच. गेल्या अनेक वर्षांपासून ती नियमित योगाभ्यास करते. शिवाय योगाचा प्रचार-प्रसारही करते. आता शिल्पाने एरिअल योगा शिकवण्याचे मनावर घेतले असल्याचे कळते. वर्षभरापूर्वी एका डान्स रिअॅलिटी शोच्या फिनालेमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी एरिअर अॅक्ट करताना दिसली होती. मात्र त्यानंतर एरिअर अॅक्ट शिल्पाने फारसा काही मनावर घेतला नव्हता. पण अलीकडे लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करताना शिल्पाची एरिअल योगाशी ओळख झाली. मग काय, शिल्पाने लगेच याचा आठवडाभराचा एक कोर्सही केला. एवढेच नाही तर आता यात अगदी निपुण होण्याचे शिल्पाचे प्रयत्न सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, यासाठी लागणारी सर्व साधन-साहित्य शिल्पाने खरेदी केले आहे, शिवाय एरिअल योगाशी संबंधित काही सीडी शिवाय पुस्तकेही तिने खरेदी केली आहे. आता एरिअल योगा आणि एरिअल योगा हेच शिल्पाचे ध्येय बनले आहे. तेव्हा आॅल दी बेस्ट शिल्प्