शिल्पाचा क्रुझवरील Oops मोमेंटचा व्हिडिओ होतोय व्हायरल, थोडक्यात बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:15 IST2019-07-24T17:15:10+5:302019-07-24T17:15:37+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील आपल्या कुटुंबासोबत युरोपमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

शिल्पाचा क्रुझवरील Oops मोमेंटचा व्हिडिओ होतोय व्हायरल, थोडक्यात बचावली
बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रेटी सध्या व्हॅकेशन मूडमध्ये दिसत आहेत. त्यात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील आपल्या कुटुंबासोबत युरोपमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. या सुट्टीतील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
शिल्पा शेट्टी सध्या यूरोपमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. शिल्पाने या व्हॅकेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप रिलॅक्स व मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. भलेही ती व्हॅकेशनसाठी गेली असली तरी ती एक्सरसाईज व डाएट करताना दिसते. तिने व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.
शिल्पाने युरोप ट्रिपमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती क्रुझवर असून ती पोझ देताना दिसते आहे. मात्र हवेमुळे तिचा ड्रेस उडू लागला आणि ती ड्रेस सावरताना दिसतेय. तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत शिल्पानं लिहिलं, ‘ही क्रूजवरची माझी मर्लिन मुनरो मोमेंट आहे.’ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर शिल्पा असं का म्हणतेय याचं उत्तर मिळेल.
यापूर्वीही शिल्पानं सोशल मीडियावर आपले अनेक फोटो शेअर केले होते. यात ती यूरोपमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करतांना दिसतेय.
शिल्पानं काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो सुपर डान्सरच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग संपवलं आहे. यानंतर ती आपल्या फॅमिलीसोबत यूरोपला व्हॅकेशनसाठी गेली.
आपल्या सुट्ट्यांचे खास व्हिडिओ आणि फोटो शिल्पा शेअर करत आहे.