शिल्पा शेट्टी कुटुंबासह लवकरच मुंबईबाहेर होणार शिफ्ट, फार्महाऊस खरेदी करण्यासाठी या ठिकाणाची केली निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 20:00 IST2020-11-16T19:55:40+5:302020-11-16T20:00:40+5:30
आतापर्यंत सेलिब्रेटींच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रेटींचे मुंबईबाहेर फार्महाऊसही आहेत. त्याच यादीत आता शिल्पा शेट्टीचेही नाव गणले जाणार आहे.

शिल्पा शेट्टी कुटुंबासह लवकरच मुंबईबाहेर होणार शिफ्ट, फार्महाऊस खरेदी करण्यासाठी या ठिकाणाची केली निवड
आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. त्यामुळे हे कपल सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं इथेच मिळतील. लवकरच शिल्पा शेट्टी कर्जतमध्ये आपले स्वतःचे आलिशान फार्महाऊस घेण्याच्याही तयारीत आहेत. त्यामुळे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मुंबईबाहेर म्हणजेच कर्जतमध्ये ती निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण घालवताना दिसली तर नवल वाटायला नको.
आतापर्यंत सेलिब्रेटींच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रेटींचे मुंबईबाहेर फार्महाऊसही आहेत. त्याच यादीत आता शिल्पा शेट्टीचेही नाव गणले जाणार आहे. आतापर्यंत आलिशान घराचे फोटो आपण पाहिले आहेत. त्यामुळे आता आलिशान असे फार्महाऊसचे फोटोही लवकरच सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतील. शिल्पाने आतापर्यंत कर्जतमधील ७-८ फार्महाऊस बघितले आहेत. काही फार्महाऊस तिला पसंतही पडले आहेत. पतीचा होकार आला तर ती लवकरच कर्जतमध्ये फार्महाऊस खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी संपूर्ण तयारी केली होती. तिने या तयारीचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअरही केला होता. या व्हिडीओत ती मुलगा विआनसोबत रांगोळी काढताना दिसली. शेवटी दोघे दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, वर्षातील सर्वात रंगीन आणि सुंदर वेळ आली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या परंपरेसोबत मी आणि विआन रांगोळी काढत आहोत. घरात देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचीही योग्य पद्धत आहे. शिल्पा शेट्टीने पुढे चाहत्यांना दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.