करिना कपूरच्या वजनवाढीवर शिल्पा शेट्टीने म्हटले, ‘मैने भी ये सब झेला था!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 16:47 IST2017-02-17T11:16:00+5:302017-02-17T16:47:53+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वीच आई बनलेल्या अभिनेत्री करिना कपूर हिला वजन वाढीमुळे टीकेचा सामना करावा लागत आहे. आता यात अभिनेत्री ...

Shilpa Shetty said at the weight of Kareena Kapoor, "I also had all this!" | करिना कपूरच्या वजनवाढीवर शिल्पा शेट्टीने म्हटले, ‘मैने भी ये सब झेला था!’

करिना कपूरच्या वजनवाढीवर शिल्पा शेट्टीने म्हटले, ‘मैने भी ये सब झेला था!’

ल्या काही दिवसांपूर्वीच आई बनलेल्या अभिनेत्री करिना कपूर हिला वजन वाढीमुळे टीकेचा सामना करावा लागत आहे. आता यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचीही भर पडली असून, वजन वाढीच्या टीकेचा काय त्रास होत असतो, याचा मी अनुभव घेतल्याचे तिने म्हटले आहे. 

वर्क आउट करताना व्हिडीओ शेअर करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘वेलनेस’ या वेबसाइटच्या लॉँचिंगप्रसंगी ती बोलत होती. यावेळी ती म्हणाली की, गर्भावस्था काळात वजन वाढल्यानंतर होणाºया टीका खूपच निरुत्साही करणाºया असतात. हा अनुभव माझ्यासाठी एकप्रकारे भीतीदायक होता. करिनावर तिच्या वजनवाढीमुळे टीका होत असल्याचे शिल्पा शेट्टी हिने ऐकले होते. त्यावर बोलताना शिल्पा म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून तिच्यावर पडत असलेला दबाव मी समजू शकते. कारण इंडस्ट्रीमध्ये तिला फिट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. 



यावेळी शिल्पा स्वअनुभव सांगताना म्हटले की, मी आई बनल्यानंतर तब्बल पाच महिने घराबाहेर पडले नव्हते. डिलिव्हरीनंतर मी माझ्या पतीबरोबर ब्रंच करायला गेली होती, तेव्हा काही महिला माझ्या वजनावरून माझी खिल्ली उडवित असल्याचे मी ऐकले होते. त्या महिलांची चर्चा एकूण मी खूप निराश झाली होती. पण त्याचबरोबर मी असाही विचार केला होता की, लोकांना इतरांवर टीका करायला नेहमीच आवडत असतं. त्यामुळे या टीकेचा फारसा विचार न करता आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही सेलिब्रेटी असल्याने लोक तुमच्यावर टीका करतीलच, तुम्ही स्वत:ला सावरून टीकाकारांचे तोंड बंद करायला हवे, असेही शिल्पा म्हणाली. 

गेल्या काही दिवसांपूर्वीच करिना लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर अनिता डोंगरेच्या शॉस्टॉपरच्या भूमिकेत रॅम्पवर बघावयास मिळाली हाती. यावेळी तिने सिनेमांमध्ये परतणार असल्याचे संकेत दिले होते. तसेच ती लवकरच ‘विरे दी वेडिंग’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे समजले होते. वजन घटविण्यासाठी सध्या ती एका प्रसिद्ध डायटीशियन सल्ला घेत असल्याचीही माहिती समोर आली होती.  

Web Title: Shilpa Shetty said at the weight of Kareena Kapoor, "I also had all this!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.