बाबो! शिल्पा शेट्टीच्या 'बॅस्टियन'मध्ये एका रात्रीत होते इतकी कमाई, आकडा वाचून थक्कच व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:40 IST2025-10-22T15:34:02+5:302025-10-22T15:40:15+5:30
लेखिका शोभा डे यांनी सांगितला कसा असतो 'बॅस्टियन'मधला माहोल

बाबो! शिल्पा शेट्टीच्या 'बॅस्टियन'मध्ये एका रात्रीत होते इतकी कमाई, आकडा वाचून थक्कच व्हाल
शिल्पा शेट्टीचंमुंबईतील 'बॅस्टियन' रेस्टॉरंट सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. सामान्यांमध्येही आता या रेस्टॉरंटची क्रेझ आहे. दादरमधील कोहिनूरमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर हे रेस्टॉरंट आहे. तिथून मुंबईचा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. बॅस्टियनमधून शिल्पा शेट्टी एका रात्री किती कमाई करते माहितीये का? लेखिका शोभा डे यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
शोभा डे यांनी 'बॅस्टियन'बद्दल केलेल्या वर्णनानंतर तुम्ही थक्कच व्हाल. मोजो स्टोरीशी बोलताना त्या म्हणाल्या, "या रेस्टॉरंटमध्ये कथितरित्या २-३ कोटींचा बिझनेस होतो. इथे येऊन लोक एका रात्रीत लाखो रुपये खर्च करतात. मुंबई शहरात ज्याप्रकारे पैसा वाहतो ते हैराण करणारं आहे. बॅस्टियनमध्ये इतर दिवशी २ कोटी आणि वीकेंडला ३ कोटींचा बिझनेस सहज होतो. मी हे पाहण्यासाठी स्वत: त्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. कारण मी हे आकडे ऐकले तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. पण मी स्वत: जाऊन तिथला माहोल पाहिला तेव्हा मला याची जाणीव झाली. हे रेस्टॉरंट सुमारे २१००० फुट स्क्वेअरवर पसरलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये एका रात्रीत किमान १४०० उच्च्भ्रू लोक आलिशान कारमधून येतात आणि जेवणाचा आस्वाद घेतात. माहोल एन्जॉय करतात."
इथे दोन सिटींग्स आहेत. एकात जवळपास ७०० लोक बसतात. एका रात्रीत १४०० लोकांना व्यापण्याची रेस्टॉरंटची क्षमता आहे. ग्राऊंड फ्लोरवर मोठी वेटिंग लाइनही असते. मी ते सगळं पाहून शॉक झाले होते. त्या ७०० जणांमध्ये मी एकालाही ओळखत नव्हते. सगळे तरुण होते आणि मस्त टकीला ऑर्डर करत होते. प्रत्येक टेबलवर लाखोंचं बनल बनत होतं."