मीडियावर झालेल्या हल्ल्याबाबत दिले शिल्पा शेट्टीने हे स्टेटमेंट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 15:47 IST2017-09-09T10:05:51+5:302017-09-09T15:47:55+5:30

मीडियावर हल्ला होण्याची ही काही तशी पहिली वेळ नाही. याआधी अनेक वेळा बॉडीगार्डसकडून मीडियाला मारहाण करण्यात आली आहे. गत ...

Shilpa Shetty gave the statement about the attack on the media. | मीडियावर झालेल्या हल्ल्याबाबत दिले शिल्पा शेट्टीने हे स्टेटमेंट..

मीडियावर झालेल्या हल्ल्याबाबत दिले शिल्पा शेट्टीने हे स्टेटमेंट..

डियावर हल्ला होण्याची ही काही तशी पहिली वेळ नाही. याआधी अनेक वेळा बॉडीगार्डसकडून मीडियाला मारहाण करण्यात आली आहे. गत शुक्रवारी शिल्पा शेट्टी आपल्या नवऱ्यासोबत डिनर कडून बाहेर पडताना फोटोग्राफर्सने तिचे फोटो काढायला सुरुवात केली.  यावेळी शिल्पा शेट्टीही कॅमेऱ्यासमोर पोज देत होती. पण हॉटेलमधील बाऊन्सरला ही गोष्ट फारशी पटली नाही. जशी शिल्पा कारमध्ये बसून गेली. तशी तेथल्या हॉटेलच्या बॉडीगार्डसना फोटोग्राफरशी हुज्जत घालायला सुरवात केली आणि फोटोग्राफरला मारायला लागले कोणाला काही समजेपर्यंत त्या बॉडीगार्डसनी दोन फोटोग्राफर्सना एवढे मारले के ते जखमी झाले. त्यानंतर हिमांशू शिंदे आणि सोनू यांना रुग्णालयात भर्ती करावे लागले आहे. याघटनेनंतर त्या बॉउन्सर्सना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील प्रकरणाची चौकशी करतायेत. 


यावर संपूर्ण प्रकाराबाबत शिल्पाकडून सोशल मीडियावर स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. शिल्पाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे,  ''हे देवा ! ज्या प्रकार या फोटोग्राफरांना मारण्यात आले आहे ते अत्यंत वाईट आहे. हे सगळे कारण नसताना झाले आहे.'' पुढे ती म्हणाली आहे. ''जो काही प्रकार घडला त्याबाबत मला दु:ख झाले आहे. हे फोटोग्राफर्स एक फोटोसाठी तासनतास उभे असतात. कोणालाही आपल्या कामासाठी मारणं जाणे चुकिचे आहे. हे संपूर्ण प्रकरण निंदनीय आहे.''   शिल्पाने या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख पापीराज म्हणून केला आहे.ट्विटरवर संपूर्ण प्रकारची निंदा करण्यात येते आहे. पार्टी असो किंवा रेस्टॉरंट, बॉलिवूड स्टार जिथे जातात, तिथे कॅमेरा त्यांचा पाठलाग करत असतो. त्यामुळे अनेक वेळा अशा प्रकारचे हल्ले मीडियावर करण्यात आले आहेत. 

Web Title: Shilpa Shetty gave the statement about the attack on the media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.