शिल्पा म्हणते,‘आय लव्ह माय हजबंड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 12:12 IST2016-06-14T06:42:50+5:302016-06-14T12:12:50+5:30

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे घटस्फोट घेणार असून ते लवकरच एकमेकांच्या आयुष्यापासून वेगळे होणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच ...

Shilpa says, 'I love my hajjand' | शिल्पा म्हणते,‘आय लव्ह माय हजबंड’

शिल्पा म्हणते,‘आय लव्ह माय हजबंड’

ल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे घटस्फोट घेणार असून ते लवकरच एकमेकांच्या आयुष्यापासून वेगळे होणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच रंगू लागल्या होत्या. पण, अशी चर्चा सुरू होताच शिल्पाने तिचा बर्थडे पती राजसोबत साजरा केला आणि संपूर्ण मीडीयासमोर ते एकत्र दिसले.

त्यानंतरही माध्यमांनी त्यांची पाठ सोडलीच नाही. मग, शिल्पाने सरळ मीडियाला सांगितले की,‘ या अफवा संपूर्णपणे खोट्या असून या कुठून येताहेत हे माहिती नाही. मी लग्न या प्रकारात विश्वास ठेवते. माझं माझ्या पतीवर खुप प्रेम आहे.

त्याच्यावर माझा खुप विश्वास आहे. लंडन येथून माझे बरेच नातेवाईक आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, माध्यमांनी आता थोडंसं दुसºयांपेक्षा स्वत:च्या घरात लक्ष द्यावे.

Web Title: Shilpa says, 'I love my hajjand'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.