/>शिल्पा शेट्ट्री आणि बिपाशा बसू खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, हे तुम्ही जाणताच. अनेक प्रसंगी या दोघींना एकत्र आलेलेही आपण बघितले आहे. असे असताना बिप्सच्या लग्नाला शिल्पा असणारच, असेच कुणीही गृहीत धरेल. मात्र खेदाची बाब म्हणजे, शिल्पा आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला इच्छा असूनही हजर राहू शकणार नाहीयं. यामुळे शिल्पाला मनातून फार वाईट वाटतेय...सूत्रांच्या मते, शिल्पा या लग्नाबद्दल प्रचंड उत्सूक होती. पण ऐनवेळी तिला आपला प्लॅन बदलावा लागला. शिल्पा आज नैरोबी(केन्या)साठी रवाना झाली. येथे शिल्पा एक चॅरिटी परफॉर्म करणार आहे. यातून येणारा पैसा कॅन्सर रूग्णांसाठी काम करणाºया एका संस्थेला दान करण्यात येणार आहे. शिल्पा सात वर्षांनंतर लाईव्ह स्टेज परफॉर्मेंस देत आहे. अशास्थितीत ती आयोजकांना नाही म्हणू शकणार नव्हतीच. त्यामुळेच उद्यस बिप्सच्या लग्नाला मनात असूनही ती हजर राहू शकणार नाहीयं. अर्थात आज मेहंदी सेरेमनीला शिल्पाने आवर्जून हजेरी लावली.
![]()