जान्हवी नव्हे तर सारा तेंडुलकरसोबत दिसला शिखर पहाडिया, Video पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 11:09 IST2024-01-06T11:09:31+5:302024-01-06T11:09:56+5:30

शिखर पहाडियासोबत पार्टी करताना दिसली सारा तेंडुलकर

Shikhar Pahariya and Sara Tendulkar partying together video viral netizens trolled starkids | जान्हवी नव्हे तर सारा तेंडुलकरसोबत दिसला शिखर पहाडिया, Video पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

जान्हवी नव्हे तर सारा तेंडुलकरसोबत दिसला शिखर पहाडिया, Video पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

मनोरंजनविश्वात सध्या शिखर पहाडिय(Shikhar Pahariya) हे नाव खूपच चर्चेत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तो नातू आहे. गेल्या काही वर्षांपासून शिखर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) एकमेकांना डेट करत आहेत. मधल्या काळात त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र आता ते पुन्हा सोबत आले आहेत. जान्हवीने कॉफी विद करणमध्ये शिखरसोबतच्या नात्याची कबुलीही दिली. मात्र इतर वेळी जान्हवीसोबत दिसणारा शिखर आता चक्क सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) दिसला. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्या स्टारकीड्सची सोशल मीडियावर सतत चर्चा असते. जान्हवी कपूर-शिखर पहाडिया, अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर, सुहाना खान-अगस्त्य नंदा यांची चर्चा असते. तर मधल्या काळात सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल यांचंही अफेअर चर्चेत होतं. काल रात्री मात्र पार्टीत वेगळंच चित्र दिसलं. सारा तेंडुलकर चक्क शिखर पहाडियासोबत एकाच कारमधून गेली. जान्हवीला सोडून शिखर सारासोबत काय करतोय असा प्रश्न सर्वांनाच पडला. 'फिल्मीग्यान' या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सारा गाडीत मागे बसली आहे तर शिखर फ्रंट सीटवर बसला आहे. दोघंही हसताना दिसत आहेत. 

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही ट्रोलिंगची संधी सोडलेली नाही. 'शुभमन आणि जान्हवी एका कोपऱ्यात रडत असतील' अशी कमेंट करत नेटकऱ्याने त्यांची मजा घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच शिखर जान्हवीसोबत तिरुपतीच्या दर्शनाला गेला होता. आता त्याचा सारासोबतचा व्हिडिओ पाहून नेटकरीही संभ्रमात पडले आहेत.

Web Title: Shikhar Pahariya and Sara Tendulkar partying together video viral netizens trolled starkids