वरळी फेस्टिव्हलमध्ये शिबानी कश्यपचा सुरेल परफॉर्मन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:52 IST2019-02-01T19:52:31+5:302019-02-01T19:52:51+5:30
साऊथ मुंबईचा सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक फेस्टिव्हल ‘वरळी फेस्टिव्हल 5.0’ नुकताच वरळी सी फेस प्रोमेनेड येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

वरळी फेस्टिव्हलमध्ये शिबानी कश्यपचा सुरेल परफॉर्मन्स
साऊथ मुंबईचा सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक फेस्टिव्हल ‘वरळी फेस्टिव्हल 5.0’ नुकताच वरळी सी फेस प्रोमेनेड येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
‘वरळी फेस्टिव्हल’चे हे पाचवे वर्ष असल्यामुळे मोठ्या जल्लोषात हा महोत्सव पार पडला. आठ पेक्षाही अधिक बँड्स आणि आर्टिस्टने केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ‘बँड ऑफ बॉईज्’, ‘युफोनी’, ‘चारु सेमवल’, ‘शिबानी कश्यप’, ‘एन. कुलकर्णी’, ‘मोहित कपूर’, ‘राहूल गोम्स’ या कलाकारांच्या दमदार परफॉर्मन्सने या महोत्सवाला चारचाँद लागले. याव्यतिरिक्त वरळीचे मुळ रहिवाशी असणाऱ्या कोळी समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले. आहेत.
संगीता आणि सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आयोजित केलेला दोन दिवसीय 'वरळी फेस्टिवल' हा उत्साहवर्धक वातावरणात धमाकेदारपणे पार पडला. वरळी सी फेसचे रूप या दोन दिवसांसाठी पूर्णपणे पालटून गेले होते. वरळी समुद्रकिनारा हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य संस्कृती, खेळ, विविध गोष्टींची आणि पदार्थांची भव्य दिव्य बाजारपेठ आणि लोकनृत्य, संगीत या सगळ्याने सजला होता.