शिबानी दांडेकरचा खुलासा, फरहान अख्तरसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:45 IST2022-03-10T18:36:25+5:302022-03-10T18:45:30+5:30
बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओंबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चेत झाली.

शिबानी दांडेकरचा खुलासा, फरहान अख्तरसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण, म्हणाली-
बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओंबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चेत झाली. दरम्यान, शिबानीने फरहान अख्तरसोबत लग्न का केले याबाबत मोठा खुलासा केला आहे.
शिबानी दांडेकरने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने सांगितले की तिने फरहान अख्तरसोबत लग्न का केलं. शिबानी दांडेकरने इन्स्टाग्रामवर फराह खानची पोस्ट पुन्हा पोस्ट केली आहे. फोटोमध्ये शिबानी दांडेकर आणि फराह खान कॅमेऱ्यासाठी हसताना दिसत आहेत. तिची इंस्टाग्राम स्टोरीवर फराह खानची पोस्ट शेअर करत शिबानीने लिहिले, तुझ्यावर खूप प्रेम आहे! मी फक्त तुझी वहिनी होण्यासाठी फरहानशी लग्न केले आहे.
शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी 19 फेब्रुवारी रोजी खंडाळ्याच्या फार्महाऊसवर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. फार्महाऊसमध्ये लग्न केल्यानंतर या जोडप्याने 21 फेब्रुवारीला मुंबईत नोंदणीकृत विवाह केला होता. शिबानी याआधी इन्स्टाग्रामवर तिचा बायो बदलल्यामुळे चर्चेत आली होती. शिबानीने लग्नाच्या काही दिवसांनंतरच इंस्टाग्रामच्या बायोमध्ये मिसेस अख्तर असे लिहिले होते पण नंतर ते काढून टाकले. दरम्यान, 2016 पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना डेट करत होते. अखेर कुटुंबाच्या संमतीने या दोघांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. हे लग्न विविध कारणांमुळे चर्चेत राहिलं. फरहानच्या मुली या लग्नात उपस्थित होत्या म्हणून एकीकडे चर्चा रंगली. तर, फरहानची पहिली पत्नी अधुना या लग्नामुळे ट्रोल झाली. त्यामुळे हे लग्न अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलं.