शिबानी हातावरील टॅटूचं अन् लग्नाचं आहे खास कनेक्शन; तुम्हाला कळला का या टॅटूचा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 17:20 IST2022-02-28T17:20:00+5:302022-02-28T17:20:00+5:30

Shibani dandekar: शिबानीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या हातावरचा टॅटू दाखवला आहे.

shibani dandekar gets wedding date tattooed on her arm farhan akhtar wife | शिबानी हातावरील टॅटूचं अन् लग्नाचं आहे खास कनेक्शन; तुम्हाला कळला का या टॅटूचा अर्थ?

शिबानी हातावरील टॅटूचं अन् लग्नाचं आहे खास कनेक्शन; तुम्हाला कळला का या टॅटूचा अर्थ?

अभिनेता फरहान अख्तर (farhan akhtar) आणि शिबानी दांडेकर (shibani dandekar) या दोघांचं बहुचर्चित ठरलेलं लग्न अखेर पार पडलं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी १९ फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्न केलं. विशेष म्हणजे या लग्नाला एक आठवडा उलटल्यानंतरही त्यांची चर्चा होताना दिसत आहे. शिबानीच्या कपड्यांपासून ते तिच्या प्रेग्नंसीपर्यंत प्रत्येक गोष्टीची नेटकऱ्यांमध्ये सध्या चर्चा होत आहे. यामध्येच आता शिबानी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. लग्नानंतर शिबानीने तिच्या हातावर खास टॅटू गोंदवून घेतला आहे.

शिबानी सोशल मीडियावर सक्रीय असून तिने लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या लग्नापूर्वीच्या विधींपासून ते फरहानच्या घरात गृहप्रवेश करेपर्यंत अनेक फोटोंचा समावेश आहे. यामध्येच आता शिबानीने तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत हातावर काढलेला टॅटू दाखवला आहे. शिबानीने तिच्या हातावर लग्नाची तारीख गोंदवून घेतली आहे.

हिरेजडीत ड्रेस अन् 82 हजारांची सँडल; शिबानीचा लग्नातील थाट पाहून व्हाल थक्क

शिबानी आणि फरहान यांनी कोणत्याही रितीरिवाजाप्रमाणे लग्न न करता केवळ Vows (वचन) एक्सचेंज करुन साध्या पद्धतीने लग्न केलं. १९ तारखेला या जोडीने लग्न केल्यानंतर २१ फेब्रुवारीला त्यांनी कायदेशीर रजिस्ट्रेशनदेखील केलं. त्यानंतर शिबानीने तिच्या लग्नाची तारीख हातावर गोंदवून घेतली आहे.
 

वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos

शिबानीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या हातावरचा टॅटू दाखवला आहे. या हातावर तिने रोमन लेटर्समध्ये २१ फेब्रुवारी २०२२ ही लग्नाची तारीख गोंदवून घेतली आहे.

दरम्यान, लग्नानंतर शिबानीने सोशल मीडियावर लगेचच तिचं नाव बदललं आहे. तिने तिच्या नावापुढे शिबानी दांडेकर- अख्तर असं सासरचं आडनाव जोडलं आहे. तसंच लग्नानंतर तिचा एक फोटो शेअर करत 'Mrs A' असं कॅप्शनही तिने दिलं होतं.
 

Web Title: shibani dandekar gets wedding date tattooed on her arm farhan akhtar wife