WHAT! लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचे ब्रेकअप, एकमेकांना भेटणं केलं बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 18:19 IST2022-04-23T12:40:23+5:302022-04-23T18:19:22+5:30
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या.

WHAT! लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचे ब्रेकअप, एकमेकांना भेटणं केलं बंद
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांना एकत्र पाहणे चाहत्यांना आवडते. शेरशाह या चित्रपटात या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यासमोर येतायेत. सिद्धार्थ आणि कियारा यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराचे मार्ग वेगळे झाले आहेत.
सध्या हे लव्हबर्ड एकमेकांना भेटत नाहीत. त्यांच्यात काय झाले हे माहीत नसले तरी त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना नक्कीच मोठा धक्का बसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इतर सेलिब्रिटींप्रमाणे कियारा आणि सिद्धार्थही लवकरच लग्नबंधनात अडकतील, अशी सर्वांना आशा होती. मात्र, आता हे शक्य नाही.
या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत, परंतु कियारा आणि सिद्धार्थने त्यांचं नातं स्वीकारले नाही. अनेकदा दोघेही डिनर डेट आणि व्हेकेशनवर जाताना दिसले. वर्क फ्रंटवर, कियारा अडवाणी लवकरच कार्तिक आर्यनसोबत भूलभुलैया 2 मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाशिवाय कियारा अडवाणी गोविंदा नाम मेरा आणि जुग-जुग जिओमध्ये दिसणार आहे.