शर्मन जोशी आहे प्रेम चोप्राचा जावई; जाणून घ्या त्याची भन्नाट लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:24 PM2021-09-30T15:24:11+5:302021-09-30T15:25:50+5:30

Sharman joshi: अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या शर्मनचा कलाविश्वातील वावर तसा पूर्वी सारखा राहिलेला नाही.

Sherman Joshi is Prem Chopra's son-in-law; Learn his abandoned love story | शर्मन जोशी आहे प्रेम चोप्राचा जावई; जाणून घ्या त्याची भन्नाट लव्हस्टोरी

शर्मन जोशी आहे प्रेम चोप्राचा जावई; जाणून घ्या त्याची भन्नाट लव्हस्टोरी

googlenewsNext
ठळक मुद्देशर्मनची पत्नी कोणी सर्वसाधारण तरुणी नसून बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध खलनायकाची मुलगी आहे. 

आपल्या विनोद बुद्धीने लाखो प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता म्हणजे शर्मन जोशी sharman joshi  . 'थ्री इडियट्स' या चित्रपटात राजू ही भूमिका साकारून शर्मनने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. परंतु, या अभिनेत्याला खरी ओळख मिळाली ती 'स्टाईल' या चित्रपटामुळे. 'रंग दे बसंती', 'थ्री इडियट्स' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या शर्मनचा कलाविश्वातील वावर तसा पूर्वी सारखा राहिलेला नाही. मात्र, तरीदेखील तो सातत्याने चर्चेत येत असतो. यावेळी सोशल मीडियावर त्याची आणि त्याच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शर्मनची पत्नी कोणी सर्वसाधारण तरुणी नसून बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध खलनायकाची मुलगी आहे. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा prem chopra यांना तीन मुली असून यापैकी एकीने शर्मन जोशीसोबत लग्न केलं आहे.  प्रेम चोप्रा यांना पुनिता, रतिका आणि प्रेरणा अशा तीन मुली आहेत. यामध्ये पुनिताने अभिनेता विकास भल्लासोबत लग्न केलं आहे. तर रतिकाचा पती पब्लिसिटी डिझायनर राहुल नंदा आहे. यापैकी प्रेरणाने शर्मन जोशीसोबत लग्न केलं आहे.

बहीण-भावाची भूमिका साकारणारे 'हे' कलाकार आहेत खऱ्या आयुष्यात पती-पत्नी

शर्मन आणि प्रेरणा यांचं लव्ह मॅरेज असून त्यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १५ जून २००० मध्ये या दोघांनी कुटुंबाच्या संमतीने मुंबईत लग्नगाठ बांधली.  शर्मन आणि प्रेरणाला एक मुलगी आणि दोन जुळी मुलं आहेत.

दरम्यान, प्रेम चोप्रा बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायक असून त्यांनी ८० चा काळ गाजवला आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
 

Web Title: Sherman Joshi is Prem Chopra's son-in-law; Learn his abandoned love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.