"इंटिमेट सीन करताना नखरे...", रेखासोबतच्या 'उत्सव' सिनेमाचा किस्सा; शेखर सुमन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 19:30 IST2024-04-23T19:30:00+5:302024-04-23T19:30:02+5:30

इंटिमेट सीन करताना रेखा यांनी मला...शेखर सुमन काय म्हणाले?

Shekhar Suman recalls him working with veteran actress Rekha in Utsav movie says she was very prefessional | "इंटिमेट सीन करताना नखरे...", रेखासोबतच्या 'उत्सव' सिनेमाचा किस्सा; शेखर सुमन म्हणाले...

"इंटिमेट सीन करताना नखरे...", रेखासोबतच्या 'उत्सव' सिनेमाचा किस्सा; शेखर सुमन म्हणाले...

हिंदी अभिनेते शेखर सुमन (Shekhar Suman) बऱ्याच काळानंतर चर्चेत आले आहेत. याचं कारणही खास आहे. संजय लीला भन्साळींच्या आगामी 'हीरामंडी' सीरिजमध्ये ते झळकणार आहेत. 2017 नंतर ते पुन्हा स्क्रीनवर दिसणार आहेत. हीरामंडीच्या प्रमोशनदरम्यान ते अभिनयासंदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. 

शेखर सुमन यांनी रेखा यांच्यासोबत 'उत्सव' सिनेमात काम केल होतं. यात त्यांचे इंटिमेट सीन्सही होते. तसंच सिनेमाच्या चित्रीकरणावेळीच रेखा यांच्या घरी इनकम टॅक्सने छापेमारी केली. हा सगळा अनुभव सांगताना सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन म्हणाले, "माझ्यासारख्या न्यूकमरसाठी रेखा यांच्यासोबत काम करण्याची मोठी संधी होती. अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही. १५ दिवसात मी फिल्म साईन केली होती. मी नेहमीच शशि कपूर, रेखा, गिरिश कर्नाड यांचा आभारी राहील. मी रेखा यांच्यासारखी प्रोफेशनल अभिनेत्री पाहिली नाही. मला आठवतंय की शूटिंग सुरु असतानाच तिकडे रेखा यांच्या घरी इनकम टॅक्सची धाड पडली. कोणीही दुसरा कलाकार असता तर बॅग भरुन तातडीने घरी गेला असता. पण रेखा म्हणाल्या त्यांना त्यांचं काम करु दे मी इथे माझं काम करेन."

ते पुढे म्हणाले, "इंटिमेट सीन शूट करताना  त्यांनी अजिबात नखरे दाखवले नाहीत. इतर अभिनेत्री करतात पण त्यांनी मला स्पर्श करण्यापासून थांबवलं नाही. त्या खूपच प्रोफेशनल आहेत. या सिनेमानंतर मला वाटलं होतं की माझं करिअर सुसाट चालेल पण असं झालं नाही. मी बरेच सिनेमे केले अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत केले. पण एका पॉइंटनंतर चांगल्या भूमिका येणं बंद झालं. मग मात्र मी मागे हटलो. मी कधीच नशिबाला दोष दिला नाही उलट मी काय कमावलं यावर लक्षकेंद्रित केलं."

Web Title: Shekhar Suman recalls him working with veteran actress Rekha in Utsav movie says she was very prefessional