शेखर कपूर शोभिताच्या प्रेमात!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 22:14 IST2016-06-30T16:44:04+5:302016-06-30T22:14:04+5:30
शेखर कपूर यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘पानी’ रखडला होता. पण आता ‘पानी’ मार्गी लागल्याची बातमी आहे. नव्या प्रॉडक्शन टीमसह शेखर ...

शेखर कपूर शोभिताच्या प्रेमात!!
श खर कपूर यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘पानी’ रखडला होता. पण आता ‘पानी’ मार्गी लागल्याची बातमी आहे. नव्या प्रॉडक्शन टीमसह शेखर कपूर आपला हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सत्यात उतरविण्यासाठी कामाला लागले आहेत. केवळ एवढेच नाही तर या चित्रपटासाठी शेखर यांनी ‘रमन राघव 2.0’ची अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला साईनही केले आहे. अनुराग कश्यपच्या माध्यमातून शोभिता व शेखर यांच्यात अनेक बैठका झाल्या आणि अखेर शोभिताने हा चित्रपट साईन केला. मिस अर्थ इंडिया २०१३ चा किताब जिंकलेल्या शोभिताचा ‘रमन राघव 2.0’मधील अभिनय पाहून शेखर चांगलेच प्रभावित झाले आहेत. ते अक्षरश: तिच्या अभिनयाच्या प्रेमातच पडले. इतके की, त्यांनी शोभिताला आपल्या चित्रपटाची आॅफरच देऊन टाकली. ‘पानी’हा चित्रपट भविष्यातील जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर एका प्रलयाची कथा असल्याचे समजते. आता शोभिता या चित्रपटात किती रंग भरते, ते बघूच!
![]()