'पठाण' नंतर बुर्ज खलिफावर झळकला 'शहजादा', कार्तिकची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:33 IST2023-02-16T15:31:40+5:302023-02-16T15:33:13+5:30
अभिनेता कार्तिक आर्यनने आता बॉलिवूडच्या बादशाहला टक्कर दिली आहे.

'पठाण' नंतर बुर्ज खलिफावर झळकला 'शहजादा', कार्तिकची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
अभिनेता कार्तिक आर्यनने आता बॉलिवूडच्या बादशाहला टक्कर दिली आहे. कार्तिकचा 'शहजादा' हा सिनेमा उद्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. शहजादाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. कार्तिकची अॅक्शन भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथील इंडिया गेटवर शहजादाचा ट्रेलर लॉंच पार पडला. तर आता थेट जगातील सर्वात उंच इमारत दुबईच्या बुर्ज खलिफावर सुद्धा शहजादाची झलक दाखवण्यात आली.
सध्या शहजादा कार्तिक आर्यन सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. शाहरुख खानच्या पठाणचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला होता. आता कार्तिकनेही बाजी मारली आहे. सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून कार्तिक पूर्ण प्रयत्न करताना दिसतोय. बुर्ज खलिफावर हा शहजादाचा प्रमोशनल टीझर दिसताच सर्व लोकांनी ओरडत जल्लोष केला. कार्तिक स्वत: तिथे उपस्थित होता. त्याने सर्व चाहत्यांसोबत फोटोही काढले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शहजादा रोहित धवनने दिग्दर्शित केला आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, क्रिती सेनन, मनिषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांची भूमिका आहे. उद्या १७ फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.