हर हर महादेव... शहनाज गिल शिवभक्तीत तल्लीन, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:17 IST2025-02-26T17:16:49+5:302025-02-26T17:17:07+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल ही त्र्यंबकेश्वर पोहचली आहे.

Shehnaaz Gill Visits Trimbakeshwar Temple Seeks Blessings From Lord Shiva On Maha Shivratri 2025 | हर हर महादेव... शहनाज गिल शिवभक्तीत तल्लीन, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन

हर हर महादेव... शहनाज गिल शिवभक्तीत तल्लीन, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे घेतले दर्शन

Shehnaaz Gill Visits Trimbakeshwar Temple: आज २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री (Maha Shivratri 2025 ) आहे. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. हिंदूधर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी माता सतीची अनेक वर्षांची तपश्चर्या यशस्वी झाली, त्यांना महादेव त्यांच्या पतीच्या रूपात प्राप्त झाले. महाशिवरात्रीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होते. अशातच बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल ही त्र्यंबकेश्वर पोहचली आहे.

 महाशिवरात्रीच्या दिवशी शहनाज गिल महादेवाची मनोभावे पूजा करताना पाहायला मिळाली. शहनाज गिलनं त्र्यंबकेश्वर मंदिरात महादेवाची पुजा केली आणि आशीर्वाद घेतले. शहनाजने मंदिरातील काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय. हे फोटो पोस्ट करतत तिनं कॅप्शन "ओम नमः शिवाय" असं लिहलं. शहनाजच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. तसेच तिला महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या.


शहनाज गिलचं नाही तर बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार महादेवभक्त आहेत. अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेत्री रविना टंडन यांनी १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतलेले आहे. अभिनेता अजय देवगणचीदेखील महादेवावर प्रचंड श्रद्धा आहे. याशिवाय, कंगना राणौत, आशुतोष राणा, बॉलिवूड गायक कैलाश खेर हे देखील शिवाचे भक्त आहेत.

Web Title: Shehnaaz Gill Visits Trimbakeshwar Temple Seeks Blessings From Lord Shiva On Maha Shivratri 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.