शहनाज गिलला मिळाला डिस्चार्ज, तोंडाला मास्क लावून रुग्णालयातून बाहेर पडली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:45 IST2023-10-11T10:45:27+5:302023-10-11T10:45:55+5:30

नुकत्याच रिलीज झालेल्या 'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमात शहनाज गिलने भूमिका साकारली आहे.

shehnaaz gill got discharge from hospital she was diagnosed with food infection | शहनाज गिलला मिळाला डिस्चार्ज, तोंडाला मास्क लावून रुग्णालयातून बाहेर पडली अभिनेत्री

शहनाज गिलला मिळाला डिस्चार्ज, तोंडाला मास्क लावून रुग्णालयातून बाहेर पडली अभिनेत्री

'बिग बॉस' फेम सर्वांची लाडकी अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात अॅडमिट झाली होती. फूड इन्फेक्शनमुळे तिला अॅडमिट व्हावे लागले होते. शहनाज गिलची ही बातमी कळताच चाहते चिंतेत पडले होते. मात्र आता त्यांच्या जीवात जीव आला आहे. कारण काल रात्रीच शहनाजला डिस्चार्ज मिळाला आहे. मास्क लावून शहनाज हॉस्पिटलबाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या 'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमात शहनाज गिलने भूमिका साकारली आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये ती गेल्या अनेक दिवसांपासून व्यस्त होती. ठिकठिकाणी सिनेमाची टीम प्रमोशनसाठी पोहचत होती. दरम्यान शहनाजने सँडविच खाल्ल्याने तिला इन्फेक्शन झाल्याची माहिती तिने स्वत: लाईव्ह येत दिली. सिनेमाची निर्माती रिया कपूर, सहकलाकार अनिल कपूर यांनी तिची विचारपूसही केली. आता शहनाजला डिस्चार्ज मिळाला असून तिची तब्येत सुधारत आहे. 

बिग बॉसनंतर शहनाज गिलचं नशीबच उजळलं. तिने अनेक म्यूझिक अल्बममध्ये काम केलं. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर आता 'थँक्यू फॉर कमिंग' मध्ये तिला महत्वाची भूमिका मिळाली. याशिवाय ती युट्यूबवर तिचा स्वत:चा चॅट शोही करते. 

Web Title: shehnaaz gill got discharge from hospital she was diagnosed with food infection