'ती परत येतेय', आदिती पोहनकरने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 03:38 PM2021-03-06T15:38:39+5:302021-03-06T15:40:56+5:30

आदिती पोहनकर सोशल मीडियावरील फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

'She is coming back', Aditi Pohankar shared the photo and gave good news to the fans! | 'ती परत येतेय', आदिती पोहनकरने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबरी!

'ती परत येतेय', आदिती पोहनकरने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबरी!

googlenewsNext


लय भारी चित्रपटातील नंदिनी आठवतेय का तुम्हाला.... नंदिनीचा तो ग्लॅमरस रोल पडद्यावर साकारला होता, अभिनेत्री आदिती पोहणकर हिने. लय भारी चित्रपटातून आदितीने करिअरची सुरुवात केली आणि तिच्या त्या पहिल्याच ‘डेब्यु’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली. रितेश देशमुखबरोबर तिला करिअरच्या फर्स्ट सिनेमामध्ये स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. आदिती पोहनकरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नाही. या चित्रपटानंतर तिने ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले होते. त्यानंतर ती शी या वेबसीरिजमध्ये झळकली होती. तिच्या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता तिचा शी या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.


अदिती पोहनकरने शी वेबसीरिजमधील फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिले की, ती (शी) परत येतेय. आम्ही तयार आहोत.भूमी २०२१मध्ये परत येणार आहे पण ती कोणाच्या बाजूने आहे? पुढील सीझनमध्ये ट्विस्ट, टर्न्स आणि धक्कादायक गोष्टी समोर येणार आहेत. मगाशी म्हणाल्या प्रमाणे आम्ही तयार आहोत.


 इम्तियाज अली लिखित शी या वेबसीरिजमध्ये आदितीने महिला पोलिसाची भूमिका साकारली आहे. जिचे नाव परदेसी आहे. ती पोलीस दलाच्या मदतीने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला पकडण्यासाठी वेश्या बनते.


या भूमिकेबद्दल आदितीने आयएएनएसला सांगितले होते की, परदेसी ही डरपोक व्यक्ती आहे. जी जीवनात संसारिक गोष्टीत अडकली आहे. ती कामाला जाते व घरी परतते. जेव्हा ती घरी जाते तेव्हा ती कुटुंबासोबत असते. ती वास्तविक जीवन जगत असते. कित्येकदा ती उदास असते.


ती पुढे म्हणाली होती की, हे खूप चॅलेजिंग होते. पण सर्व श्रेय इम्तियाज सरांना जाते. त्यांनी खूप चांगला अभ्यास करायला लावले. सोबतच आम्ही खूप चर्चा केली. आरिफ सर व अविनाश सरांमुळे मला कोणताही त्रास झाला नाही. हा खूप अप्रतिम प्रवास होता.
अदिती पोहनकरचे चाहते शीचा दुसरा सीझन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Web Title: 'She is coming back', Aditi Pohankar shared the photo and gave good news to the fans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.