सोनाक्षीच्या लग्नाबाबत वडिलांनाच माहीत नाही, शत्रुघ्न सिन्हा म्हणाले- "आजकालची मुलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 10:21 IST2024-06-11T10:21:13+5:302024-06-11T10:21:46+5:30

Sonakshi Sinha Marriage : सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन, म्हणाले, "तिने मला विश्वासात घेतलं असतं तर..."

shatrughna sinha unaware of daughter sonakshi sinha marriage plans said i didnt know anything | सोनाक्षीच्या लग्नाबाबत वडिलांनाच माहीत नाही, शत्रुघ्न सिन्हा म्हणाले- "आजकालची मुलं..."

सोनाक्षीच्या लग्नाबाबत वडिलांनाच माहीत नाही, शत्रुघ्न सिन्हा म्हणाले- "आजकालची मुलं..."

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी लग्नाबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्री बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. जून महिन्यातच सोनाक्षी आणि झहीर लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. पण, लेकीच्या लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हाच अनभिज्ञ असल्याचं दिसत आहे. 

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे. लेकीच्या लग्नाबाबत काहीच कल्पना नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "मी सध्या दिल्लीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी इथेच आहे. मी माझ्या मुलीच्या प्लॅनबद्दल कोणाशीही काहीच बोललेलो नाही. ती लग्न करतेय का? असा तुमचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मी देऊ इच्छितो की याबाबत तिने मला काहीच सांगितलेलं नाही. मला पण तेवढंच माहीत आहे. जेवढं मी मीडियामध्ये वाचलं आहे. जर तिने मला विश्वासात घेतलं असतं तर मी आणि माझ्या पत्नीने त्यांना आशीर्वाद दिले असते. आमच्या नेहमीच तिला शुभेच्छा राहतील", असं शत्रुघ्न सिन्हा टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, "आम्हाला आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती चुकीचा निर्णय घेणार नाही, याची खात्री आहे. तिला स्वत:चे निर्णय घेण्याचा अधिकारही आहे. जेव्हा माझी मुलगी लग्न करेल तेव्हा तिच्या लग्नात वरातीसमोर नाचायला मला आवडेल. मला माझ्या जवळच्या व्यक्तींकडून प्रश्न विचारले जात आहेत की लेकीच्या लग्नाबाबत मला माहीत नाही आणि मीडियाला माहीत आहे. यावर मी हेच म्हणेन की आजकालची मुलं आईवडिलांना विचारत नाहीत तर फक्त सांगतात. आता आम्ही याची वाट पाहत आहोत". 

सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोनाक्षी आणि झहीर २३ जूनला लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं वृत्त आहे. गेल्या काही वर्षांपासून सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना डेट करत आहेत. 

Web Title: shatrughna sinha unaware of daughter sonakshi sinha marriage plans said i didnt know anything