'रॉकी और रानी...' मध्ये शर्मिला टागोर यांना होती ऑफर, 'या' कारणामुळे झाली शबाना यांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:20 PM2023-12-28T14:20:26+5:302023-12-28T14:22:21+5:30

शर्मिला टागोर यांनी यावेळी मोठा खुलासाही केला

Sharmila Tagore was offered Rocky Aur Rani ki prem kahani then Shabana Azmi entry was made | 'रॉकी और रानी...' मध्ये शर्मिला टागोर यांना होती ऑफर, 'या' कारणामुळे झाली शबाना यांची एन्ट्री

'रॉकी और रानी...' मध्ये शर्मिला टागोर यांना होती ऑफर, 'या' कारणामुळे झाली शबाना यांची एन्ट्री

करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विद करण 8' (Koffee With Karan 8) या शोचा लेटेस्ट एपिसोड लवकरच रिलीज होतोय. यावेळी बॉलिवूडची 'सपनो की रानी' अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) आणि त्यांचा स्टार अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी हजेरी लावली आहे. यावेळी करण जोहरने आई आणि लेकाशी भरपूर गप्पा मारल्या. तेव्हा करणच्याच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात शबाना आजमी यांच्या जागी शर्मिला टागोर दिसल्या असत्या असा खुलासा झाला.

करण जोहरने ७ वर्षांनी दिग्दर्शित केलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा सुपरहिट झाला. यामध्ये आलिया-रणवीर सिंह यांची केमिस्ट्री तर दिसलीच पण धर्मेंद्र-शबाना आजमी यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पण शबाना आजमी यांच्या जागी आधी शर्मिला टागोर यांना ही भूमिका ऑफर झाली होती. करणने याचा खुलासा केल्यानंतर शर्मिला टागोर म्हणाल्या, 'तेव्हा कोरोनाचा काळ होता. त्यावर उपाय म्हणून लसही आली नव्हती. आम्ही कोणीच दुसरी कोणती लस घेतली नाही. तसंच मी कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर माझ्याबाबतीत कोणताही धोका पत्करायला माझे कुटंबीय तयार नव्हते.'

शर्मिला टागोर या एपिसोडच्या माध्यमातून पहिल्यांदाच कॅन्सरबद्दल बोलल्या. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गुलमोहर' सिनेमात त्यांनी भूमिका साकारली. तसंच नात सारा अली खानसोबतही त्या काही अॅड शूट्समध्ये दिसल्या. सध्या त्या इंडस्ट्रीत पु्न्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्या आहेत. 

Web Title: Sharmila Tagore was offered Rocky Aur Rani ki prem kahani then Shabana Azmi entry was made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.