‘साहो’मध्ये अशी दिसेल श्रद्धा कपूर! फर्स्ट लूक जारी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 12:41 IST2018-03-06T07:11:19+5:302018-03-06T12:41:19+5:30
‘बाहुबली’ सीरिजमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणारा साऊथ सुपरस्टार प्रभास सध्या ‘साहो’ या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘साहो’तील प्रभासचे ...
.jpg)
‘साहो’मध्ये अशी दिसेल श्रद्धा कपूर! फर्स्ट लूक जारी!!
‘ ाहुबली’ सीरिजमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणारा साऊथ सुपरस्टार प्रभास सध्या ‘साहो’ या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘साहो’तील प्रभासचे फर्स्ट लूक तुम्ही पाहिलेच. आता या चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस श्रद्धा कपूर हिचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट श्रद्धा नायक हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फर्स्ट लूक जारी केला आहे. ( खुद्द श्रद्धाने हा लूक शेअर केलेला नाही. ) काही दिवसांपूर्वी प्रभासनेही हाच फोटो शेअर करत, श्रद्धाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
![]()
सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अॅक्शन सीन्स करतानाही ती दिसणार आहे. प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसह, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे.
गतवर्षी आॅक्टोबरमध्ये प्रभासच्या वाढदिवशी ‘साहो’चे फर्स्ट लूक समोर आले होते. यात प्रभास सुटाबुटात दिसला होता. अर्थात त्याचा चेहरा मात्र झाकलेला होता. गत डिसेंबरमध्ये रामोजी फिल्म सिटीत ‘साहो’चे बहुतांश शूटींग झाले. सूत्रांचे खरे मानाल तर, ‘साहो’मध्ये स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील.
ALSO READ : विरह झाला असह्य! चेह-याला रूमाल बांधून अनुष्का शेट्टीला भेटायला पोहोचला प्रभास!!
सुपरडुपर हिट ‘बाहुबली2’नंतर अभिनेता प्रभासचा ‘साहो’ हा पहिला सिनेमा येत आहे. त्यामुळे प्रभासच्या या सिनेमाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहे. ‘बाहुबली2’ने कमाईचे सगळे विक्रम मोडत प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवले होते. त्यामुळे ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरतो, यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.