'ऑपरेशन रोमियो'मध्ये शरद कळेकर आणि किशोर कदम दिसणार मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:28 IST2022-04-02T14:23:24+5:302022-04-02T14:28:38+5:30
शदर केळकर आणि किशोर कदम 'ऑपरेशन रेमियो' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शशांत शाह यांनी केले आहे.

'ऑपरेशन रोमियो'मध्ये शरद कळेकर आणि किशोर कदम दिसणार मुख्य भूमिकेत
अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे.छोट्या पडद्यावरील 'आक्रोश' या मालिकेतून अभिनयाची कारकिर्द सुरु केल्यानंतर 'सात फेरे', 'बैरी पिया', 'कुछ तो लोग कहेंगे' मालिकेतून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर. छोट्या पडद्यावर रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला शरद केळकर रुपेरी पडद्यावरही हिट ठरला. 'एविल रिटर्न्स', 'लय भारी', 'रामलीला', 'मोहन्जेंदडो', 'भूमी', 'हाऊसफुल्ल-4' अशा सिनेमातही तो झळकला. लवकरच तो 'ऑपरेशन रेमियो' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत किशोर कदम दिसणार आहे. ‘ऑपरेशन रोमियो’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शशांत शाह यांनी केले आहे.
'टॉयलेट-एक प्रेम कथा', 'रुस्तम' आणि 'नाम शबाना' यांसारख्या अभूतपूर्व हिट चित्रपटांनंतर फ्रायडे फिल्मवर्क्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट प्रॉडक्शन, 'ऑपरेशन रोमियो' हा नीरज पांडे आणि शितल भाटिया यांचा सहावा चित्रपट आहे.
नीरज पांडे हे चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. त्याने याआधी 'ए वेन्सड़े', 'स्पेशल 26', 'एमएस' धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि समीक्षकांनी प्रशंसित अत्यंत यशस्वी थ्रिलर मालिका, 'स्पेशल ऑप्स' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.