टायगर आणि दिशानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप, म्हणाली-मला वाटते की..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 16:03 IST2022-07-27T15:58:07+5:302022-07-27T16:03:31+5:30
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीने एकमेकांना ६ वर्षे डेट केल्यानंतर वेगळे झाले आहेत. यानंतर आता आणखी एक बॉलिवूड कपलने वेगळे झाल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय.

टायगर आणि दिशानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप, म्हणाली-मला वाटते की..
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलिवूडमधील आवडत्या कपलपैकी एक आहेत. ६ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघे वेगळे झाले. दोघांच्या ब्रेकअपची बातमी ऐकून त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. टायगर आणि दिशाने त्यांचं नातं कधीच ऑफिशल केलं नाही. दोघांच्या यांच्या नात्यात गेल्या एक वर्षापासून बरेच चढ-उतार आले होते. पण या दोघांनी कोणतीच गोष्ट जगजाहीर नाही केली. दिशा आणि टायगरनंतर बॉलिवूडमधील आणखी एक कपलचे ब्रेकअप झालंय. सोशल मीडियावर दोघांनी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
ही अभिनेत्री आहे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी(Shamita Shetty)... शमिता शेट्टी आणि तिचा बॉयफ्रेंड राकेश बापट (Raqesh Bapat)वेगळे झाले आहेत. शमिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून दोघांचे ब्रेकअप झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की शमिता आणि राकेशमध्ये खटके उडत होते आणि दोघेही वेगळे झाल्याच्या आहेत, मात्र त्यावेळी अभिनेत्रीने त्या वृत्तांचे खंडन केले होते आणि ते दोघेही एकत्र असल्याचे सांगितले होते, मात्र आता अभिनेत्रीनेच ब्रेकअप झाल्याचे सांगितलं.
तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करताना शमिता शेट्टीने लिहिले की, “मला वाटते की हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. राकेश आणि मी आता एकत्र नाही पण हा सुंदर म्युझिक व्हिडिओ त्या सर्व चाहत्यांसाठी आहे ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. तुमच्या प्रेमाचा वर्षाव असाच आमच्यावर करत राहा. "
शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची लव्हस्टोरी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी'पासून सुरू झाली होती. त्यानंतर दोघेही काही काळ 'बिग बॉस 15'मध्ये एकत्र दिसले होते. बाहेर आल्यानंतरही दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते, गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकत्र दिसले नव्हते, त्यामुळे दोघांमध्ये अलबेल नसल्याचे बोलले जात होते. अखेर आता शमिताने सांगितले आहे की, दोघेही दोघांचे नाते आहे ब्रेकअप झाले आहे.