करण जोहरने केले ‘लाईक’ अन् सोशल मीडियावर ट्रेंड झाला #ShameOnKaranJohar हॅशटॅग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 15:55 IST2019-03-22T15:54:35+5:302019-03-22T15:55:29+5:30

करण जोहर व शाहरुख खानची मैत्री बॉलिवूडची सर्वाधित जुनी व सच्ची मैत्री आहे. पण अलीकडे असे काही झाले की, चाहते या मैत्रीकडे संशयाच्या नजरेतून बघू लागले आणि बघता बघता सोशल मीडियावर ‘ShameOnKaranJohar’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

shame on karan johar trends on twitter as he accidently likes tweet on kesari abusing shahrukh khan | करण जोहरने केले ‘लाईक’ अन् सोशल मीडियावर ट्रेंड झाला #ShameOnKaranJohar हॅशटॅग !

करण जोहरने केले ‘लाईक’ अन् सोशल मीडियावर ट्रेंड झाला #ShameOnKaranJohar हॅशटॅग !

ठळक मुद्देराजकुमार यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली.

करण जोहरशाहरुख खानची मैत्री बॉलिवूडची सर्वाधित जुनी व सच्ची मैत्री आहे. पण अलीकडे असे काही झाले की, चाहते या मैत्रीकडे संशयाच्या नजरेतून बघू लागले आणि बघता बघता सोशल मीडियावर ‘शेमआॅनकरणजोहर’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला.
झाले असे की, अक्षय कुमार व शाहरुख खान यांची तुलना करणाऱ्या एका पोस्टला करण जोहरने लाईक केले. या पोस्टमध्ये शाहरुखच्या विरोधात बरेच काहीही लिहिलेले होते. करणने या पोस्टला लाईक केले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात चूक लक्षात येताच करणने लगेच या पोस्टला ‘अनलाईक’ केले. पण तोपर्यंत करणची ही ‘चूक’ शाहरूखच्या चाहत्यांच्या नजरेत भरली. म्हणतात ना, धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडून निघालेला वाग्बाण परत घेता येत नाही. आजकाल हीच म्हणं  ट्विटलाही लागू होते. डिलीट केलेले  ट्विट लोकांच्या नजरेतून सुटत नाहीत.

करणने शाहरुखला अक्षयपेक्षा कमी लेखणाऱ्या पोस्टला लाईक केले आणि शाहरुखचे चाहते भडकले. मग काय, या चाहत्यांनी करण जोहरचा चांगलाच क्लास घेतला. करणने शाहरुखला धोका दिला, मागून वार केला, असे काय काय शाहरुखच्या चाहत्यांनी लिहिले आणि ‘शेमआॅनकरणजोहर’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.

अद्याप करणने या सगळ्या प्रकरणावर खुलासा केलेला नाही. त्याची ती चूक अजाणतेपणी केलेली चूक होती की जाणीवपूर्वक हेही ठाऊक नाही. या चुकीसाठी शाहरूख कदाचित करणला माफही करेल. पण शाहरुखच्या चाहत्यांच्या येथे माफी नाहीच...
कालच करण जोहरचा निर्मिती असलेला ‘केसरी’ रिलीज झाला. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २१.५० कोटींची कमाई केली. याच पार्श्वभूमीवर अक्षय व शाहरूखची तुलना करणारी पोस्ट केली गेली होती.

Web Title: shame on karan johar trends on twitter as he accidently likes tweet on kesari abusing shahrukh khan