"पार्टीत फक्त पुरुष आहेत, तू प्लीज ये ना...", 'शक्तिमान' फेम अभिनेत्रीकडे हिरोची विचित्र मागणी, बॉलिवूडमधला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:27 IST2026-02-18T17:26:42+5:302026-02-18T17:27:14+5:30

हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली 'शक्तिमान' फेम अभिनेत्री वैष्णवी मॅकडॉनल्ड यांनादेखील बॉलिवूडमध्ये काम करताना कास्टिंग काऊचचा अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव उघड केलं. 

shaktiman fame actress Vaishnavi Macdonald shared her casting couch experience | "पार्टीत फक्त पुरुष आहेत, तू प्लीज ये ना...", 'शक्तिमान' फेम अभिनेत्रीकडे हिरोची विचित्र मागणी, बॉलिवूडमधला धक्कादायक प्रकार

"पार्टीत फक्त पुरुष आहेत, तू प्लीज ये ना...", 'शक्तिमान' फेम अभिनेत्रीकडे हिरोची विचित्र मागणी, बॉलिवूडमधला धक्कादायक प्रकार

सिनेइंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचे अनेक धक्कादायक प्रकार होत असतात. अनेक अभिनेत्रींनी उघडपणे त्यांना आलेले अनुभव शेअरही केले आहेत. हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली 'शक्तिमान' फेम अभिनेत्री वैष्णवी मॅकडॉनल्ड यांनादेखील बॉलिवूडमध्ये काम करताना कास्टिंग काऊचचा अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव उघड केलं. 

वैष्णवी मॅकडॉनल्ड यांनी बॉलिवूड सिनेमांमधून त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली होती. वीराना, बरसात की रात, लाडला यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. मात्र बॉलिवूडमध्ये आलेल्या एका धक्कादायक अनुभवानंतर त्यांनी टीव्ही कलाविश्वाची वाट धरली. कॉम्प्रोमाइज करायला नकार दिल्याने वैष्णवी मॅकडॉनल्ड यांना सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य करत तो प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, "मला आणि माझ्या आईला ऑफिसमध्ये बोलवून सांगण्यात आलं होतं की सिनेमाचे पोस्टर आणि बॅनर्स तयार आहेत. या सिनेमात तुमची भूमिका लीड रोलपैकी एक आहे. पण, त्यानंतर सिनेमातून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला". 


"दिग्दर्शक आणि हिरोने मिळून हा निर्णय घेतला की हिला सिनेमातून काढून टाकूया. कारण मी कॉम्प्रोमाइज करायला नकार दिला होता. दिग्दर्शकाला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. पण हिरोला इंटरेस्ट होता आणि त्यावेळी तो प्रसिद्ध होता. संध्याकाळी तो मला बोलवत होता. फक्त पुरुष आहेत आणि ड्रिंक करत आहेत, तर तू प्लीज ये ना. माझी आई नेहमी माझ्या सोबत असायची आणि ही गोष्ट त्यांना खटकत होती. माझी आई मला कधीच एकटं सोडायची नाही. ती मला सोडायला आणि घ्यायला यायची. या सिनेमाचं शूटिंग स्वित्झर्लंडमध्ये होणार होतं. त्यांनी माझा पासपोर्ट बनवून घेतला होता. मात्र आईचा पासपोर्ट बनत नाहीये, असं कारण त्यांनी दिलं होतं. जेव्हा मी कॉम्प्रोमाइज करायला नकार दिला तेव्हा हिरोचा ईगो दुखावला असेल आणि त्याने मला सिनेमातून काढून टाकलं", असं वैष्णवी मॅकडॉनल्ड यांनी सांगितलं. 

Web Title : 'शक्तिमान' अभिनेत्री ने कास्टिंग काउच का अनुभव बताया; हीरो ने पार्टी में दबाव डाला।

Web Summary : वैष्णवी मैकडोनाल्ड ने बॉलीवुड में कास्टिंग काउच का सामना किया। एक हीरो ने उन पर पुरुषों की पार्टी में आने का दबाव डाला। समझौता करने से इनकार करने पर उन्हें फिल्म से निकाल दिया गया। उनकी मां की उपस्थिति से हीरो नाराज था।

Web Title : 'Shaktimaan' actress reveals casting couch experience; hero pressured her at party.

Web Summary : Vaishnavi Macdonald faced casting couch in Bollywood. A hero pressured her to attend a male-only party with drinks. She refused to compromise, leading to her removal from the film. Her mother's constant presence also irked the hero, ultimately costing her the role.