शक्ति मोहन झळकणार ह्या सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 21:00 IST2018-11-26T21:00:00+5:302018-11-26T21:00:00+5:30
शक्ति मोहन 'एबीसीडी' चित्रपटाच्या तिसऱ्या भागात झळकणार आहे.

शक्ति मोहन झळकणार ह्या सिनेमात
डान्सर व नृत्य दिग्दर्शिका शक्ति मोहनने 'तीस मार खान' व 'रावडी राठोड' या चित्रपटात आयटम साँग सादर करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता ती दिग्दर्शक व प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसुझा याच्या डान्सवर आधारीत सिनेमा 'एबीसीडी' चित्रपटाच्या तिसऱ्या भागात झळकणार आहे. चित्रपटात ती पहिल्यांदाच अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. डान्स रिऍलिटी शो 'डान्स प्लस ४' शो दरम्यान रेमोने शक्तिला चित्रपटाची ऑफर दिली होती.
'डान्स इंडिया डान्स'ची विजेती ठरलेली असतानाही शक्तिला संधी देण्यात आली नव्हती. पण, आता वरुण धवन आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'एबीसीडी- ३' मध्ये शक्तिला रुपेरी पड्दयावर अभिनय करण्याची संधी मिळाली आहे.
याबाबत शक्ति म्हणाली, मी अनेक दिवसांपासून अशा संधीच्या शोधात होते. ती संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. रेमो सरांसोबत प्रत्येकवेळी काम करताना खूप चांगले वाटते. त्यात आता त्यांच्यासोबत चित्रपटात काम करणे खूपच रोमांचक ठरणार आहे. या चित्रपटातून मी पदार्पण करणार असल्याने मी आतापासूनच शूटिंग कधी सुरू होणार याची वाट पाहत आहे.
शक्ति मोहन हिने 'तीस मार खान' आणि 'रावडी राठोड' चित्रपटात आयटम साँग केलेले आहे. तसेच छोट्या पडद्यावरील मालिका 'दिल, दोस्ती, डान्स'मध्येही तिने काम केलेले आहे. तसेच रेमोने शक्तिशिवाय 'डान्स प्लस-४'मधील वर्तिका झा हिलाही चित्रपटासाठी ऑफर दिली आहे. शक्तिचे चाहते ती या सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.