'बिग बॉस'वेळी सलमान खानसोबत झालेला वाद; आता शक्ती कपूर म्हणाले, "त्याने माफी मागावी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:43 IST2025-12-26T12:42:36+5:302025-12-26T12:43:18+5:30
'बिग बॉस'वेळी सलमान आणि शक्ती कपूर यांच्यात नक्की काय घडलं होतं? १४ वर्षांनंतरही विसरले नाहीत शक्ती कपूर

'बिग बॉस'वेळी सलमान खानसोबत झालेला वाद; आता शक्ती कपूर म्हणाले, "त्याने माफी मागावी..."
सलमान खान आणि शक्ती कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. सलमानच्याच 'अंदाज अपना अपना' सिनेमातली शक्ती कपूर यांची क्राइम मास्टर गोगोची भूमिका गाजली होती. शिवाय त्यांनी 'हॅलो ब्रदर','हम साथ साथ है','जुडवा','चल मेरे भाई' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण तुम्हाला माहितीये का शक्ती कपूर बिग बॉसमध्ये आले होते तेव्हा सलमानसोबत त्यांचा वाद झाला होता. आता अनेक वर्षांनी शक्ती कपूर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'द पॉवरफुल ह्यमुन्स' पॉडकास्टमध्ये शक्ती कपूर म्हणाले, "माझ्या मनात कोणाबद्दलच काही वाईट भावना नाहीये. मी दारु पिणं सोडून आता ५ वर्ष झाली आहेत. आता इंडस्ट्रीतही कोणीच शराबी नाही. सगळे हेल्थ फ्रीक आहेत. सगळेच बॉडीबिल्डर्स आणि सोशल ड्रिंकर्स आहेत. आधी सगळे स्टार्स सेटवर दारुच्या नशेतच असायचे."
सलमानसोबतच्या वादावर ते टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "सलमानने माझी माफी मागितली पाहिजे. बिग बॉसमध्ये एक तर त्याने आणि संजय दत्तने मला ओळख दाखवली नाही. इतरांसोबत दोघं चांगल्या गप्पा मारत होते. नंतर सलमान म्हणाला की 'बिग बॉसला मानलं पाहिजे. शक्ती कपूरसारख्या लोकांना त्यांनी घरात बोलवलं, आम्ही तर बोलवलं नसतं.' मला सलमानला हेच सांगायचंय की तू मला घरी बोलवलंस तरी मी येणार नाही. उगाचच तो माझ्याबद्दल इतकं बोलला त्यासाठी त्याने मला सॉरी म्हटलं पाहिजे."
दरम्यान शक्ती कपूर यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ट्वीट करत सलमानवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटलेलं की, "सलमानही बिग बॉस सारख्या फ्रॉडला वाचवू शकत नाही. एक असा व्यक्ती जो महिलेला मारतो, दारु पितो आणि लोकांवर गाडी चालवतो आणि काळवीटची शिकार करतो. शेम."
शक्ती कपूर २०११ साली 'बिग बॉस सीझन ५'मध्ये दिसले होते. आपण दारुपासून दूर राहू शकतो हे मुलांना दाखवून देण्यासाठी ते बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान शक्ती कपूर यांची लेक श्रद्धा कपूर आणि सलमानचा आजही चांगला बाँड आहे. ती अनेकदा सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये आली आहे.