टॉलिवूड स्टार देवसोबत दिसणार शाहरुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:33 IST2016-01-16T01:19:46+5:302016-02-07T14:33:25+5:30
पश्चिम बंगालचे पर्यटन या विषयावर एक जाहिरात फिल्म तयार करण्यात येत आहे. या फिल्मचे टॉलिवूड सुपरस्टार देव आणि शाहरुख ...

टॉलिवूड स्टार देवसोबत दिसणार शाहरुख
द स्वीटेस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन असे या फिल्मचे नाव आहे. पश्चिम बंगाल पर्यटन महामंडळाने यासाठी ८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी एका नामांकित एजंन्सीला ७५ लाख रुपये देण्यात आले आहेत. दार्जंलिंग, बोलपूर आणि समुद्र परिसरातील पर्यटन क्षेत्रांची माहिती यात असल्याचे पर्यटन विकास मंत्री ब्रत्या बसू यांनी म्हटले आहे. शाहरूख खान याचा व्हॉलिंटीअर असून, यासाठी आपण कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे त्याने म्हटलेआहे.
मात्र, अभिनेत्यांना मानधन देण्यासाठी आम्ही तरतूद केल्याचे बसू यांनी सांगितले.