​‘बाहुबली’मध्ये शाहरुखचा किमिओ : दुर्दैवाने ही केवळ अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 20:58 IST2017-02-14T15:28:17+5:302017-02-14T20:58:17+5:30

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा किमिओ असेल अशी बातमी दिवसभर चांगलीच व्हायरल होत होती. बाहुबली व शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही बातमी ...

Shahrukh kimio in 'Bahubali': Unfortunately this is only rumor | ​‘बाहुबली’मध्ये शाहरुखचा किमिओ : दुर्दैवाने ही केवळ अफवा

​‘बाहुबली’मध्ये शाहरुखचा किमिओ : दुर्दैवाने ही केवळ अफवा

लिवूडचा बादशाह शाहरुख खानचा किमिओ असेल अशी बातमी दिवसभर चांगलीच व्हायरल होत होती. बाहुबली व शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाची होती. मात्र चार वाजताच्या सुमारास बाहुबलीच्या अधिकृ त ट्विटर अकाउंटवरून ही बातमी केवळ अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. 

बाहुबलीच्या ट्विटर अकाऊंटवर सुमारे चार वाजता एक मॅसेज शेअर करण्यात आला. बाहुबलीच्या निर्मात्यांनी लिहलेय, आम्हाला शाहरुख खानने आपल्या चित्रपटात काम केल्याचे आवडलेच असते, कुणालाही ते आवडले असते? मात्र दुर्दैवाने ही केवळ अफवा आहे. हे सत्य नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपासून अशा बातम्या येत आहेत की शाहरुख खान बाहुबली२मध्ये किमिओ करणार आहे. असेही सांगण्यात येत होते की, शाहरुख खान रोमाँटिक भूमिका टाळून काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न करीत आहे, आणि बाहुबली सारख्या मोठ्या इपिक सिनेमात त्याचा किमिओ असेल. 



बाहुबली २ हा चित्रपट २८ एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. यानुसार शाहरुखच्या भूमिकेची शूटिंग व एडिटिंगसाठी बराच वेळ मिळू शकतो. दुसरीकडे चित्रपट जानकारांच्या मते, ‘बाहुबली २’ मध्ये किमिओ करण्यामागे आणखी एक कारण आहे. हे कारण म्हणजे राजमौली यांचा आगामी चित्रपट महाभारत. नुकतेच आपल्या आगामी मेगा प्रोजेक्टबद्दल राजमौली यांनी माहिती दिली असून यात आमिर खान कृष्णाची भूमिका करणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी देखील आपली संमती दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये अनेक मोठया नावाचा समावेश करण्यात येणार आहे. याच निमित्ताने राजमौलींना आपली क्षमता कळावी असा हेतू शाहरुखचा असावा. दरम्यान २५ वर्षांत प्रथमच आमिर आणि शाहरुख यांनी एकत्र सेल्फ ी घेतल्याने चर्चाना उधान आले होते. 


Web Title: Shahrukh kimio in 'Bahubali': Unfortunately this is only rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.