‘सर, मुझे भी रिकमेंड कर देना...! अमिताभ बच्चन यांना शाहरूख खानची गळ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 15:50 IST2019-03-10T15:46:59+5:302019-03-10T15:50:59+5:30

अमिताभ बच्चन व तापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट गत ८ मार्चला प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणा-या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या दोन दिवसांत १३. ५९ कोटींची कमाई केली. पण बदला’ रिलीज झाला आणि अमिताभ बच्चन यांना नव्या नोकरीची चिंता सतावू लागली.

shahrukh khans witty reply to amitabh bachchan tweet | ‘सर, मुझे भी रिकमेंड कर देना...! अमिताभ बच्चन यांना शाहरूख खानची गळ!!

‘सर, मुझे भी रिकमेंड कर देना...! अमिताभ बच्चन यांना शाहरूख खानची गळ!!

ठळक मुद्देशाहरूख सारख्याने नोकरी मागितली म्हटल्यावर तापसी पन्नू का मागे राहणार. तिनेही अमिताभ यांच्याकडे नोकरीसाठी शिफारस करण्याची विनंती केली.

अमिताभ बच्चनतापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट गत ८ मार्चला प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणा-या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या दोन दिवसांत १३. ५९ कोटींची कमाई केली. पण ‘बदला’ रिलीज झाला आणि अमिताभ बच्चन यांना नव्या नोकरीची चिंता सतावू लागली. होय, ‘बदला’चे काही रिव्ह्यू कोलाजरूपात ट्विटवर शेअर करत, अमिताभ यांनी नव्या नोकरीबद्दलची पोस्ट टाकली. ‘ये तो हो गया...अब कल नौकरी कहाँ?? ५० वर्षोंसे यही पूछता आ रहा हूँ....,’ असे त्यांनी लिहिले.




अमिताभ यांच्या या ट्विटवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या. यापैकी एक मजेदार प्रतिक्रिया होती ती किंगखान शाहरूख खानची. अमिताभ यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना शाहरूखने थेट त्यांना नोकरीसाठी शिफारस करण्याची गळ घातली. ‘सर, आपको मिल जाए नौकरी तो मुझे भी रिकमेंड कर देना,’ असे शाहरूखने लिहिले. मग काय, लोकांनी शाहरूखचे हे ट्विट रिट्विट करणे सुरु केले.




शाहरूख सारख्याने नोकरी मागितली म्हटल्यावर तापसी पन्नू का मागे राहणार. तिनेही अमिताभ यांच्याकडे नोकरीसाठी शिफारस करण्याची विनंती केली. ‘तुम्ही दोघेही मलाही तुमच्यात सामील करू शकता. मी सुद्धा चांगले काम केलेय,’ असे तिने लिहिले. 'बदला' चित्रपटाची कथा नैना सेठी (तापसी पन्नू) या महिलेवर गुंफण्यात आली आहे. नैना विवाहित असताना देखील तिचे अर्जुन जोसेफ (टोनी ल्युक)सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असते. त्याचा खून केल्याचा आरोप नैनावर असतो आणि नैना विरोधात सर्व काही पुरावे असतात. नैना या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी प्रसिद्ध वकील बादल गुप्ता (अमिताभ बच्चन) यांची निवड करते. गेल्या चाळीस वर्षात एकही केस ते हरलेले नसतात. 

Web Title: shahrukh khans witty reply to amitabh bachchan tweet