​शाहरुखला पुन्हा बनवायचा ‘रा.वन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 00:06 IST2016-04-23T18:36:55+5:302016-04-24T00:06:55+5:30

चार वर्षांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरुख खानने त्याचा सर्वात महत्त्वकांक्षी चित्रपट ‘रा.वन’ प्रदर्शित केला होता. सायन्स फिक्शन सुपरहीरो प्रकारातील हा ...

Shahrukh Khan's 'Raavan' | ​शाहरुखला पुन्हा बनवायचा ‘रा.वन’

​शाहरुखला पुन्हा बनवायचा ‘रा.वन’

र वर्षांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरुख खानने त्याचा सर्वात महत्त्वकांक्षी चित्रपट ‘रा.वन’ प्रदर्शित केला होता. सायन्स फिक्शन सुपरहीरो प्रकारातील हा चित्रपट मात्र बॉक्स आॅफिसवर फारशाी कमाल करू शकला नाही.

पण अपयशाने खचुन जाईल तो किंग खान कसला.

नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने पुन्हा एकदा ‘रा.वन’ सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, मला तर पुन्हा एकदा ‘रा.वन’ सारखा सुपरहीरो साकारायला आवडेल. पण या वयात तसे करणे शोभून दिसेल का हा मात्र प्रश्न आहे. 

अभिनव सिन्हाच्या दिग्दर्शन तयार झालेल्या या चित्रपटात करिना कपूर आणि अर्जुन रामपालदेखील होते. शाहरुख पुढे म्हणतो, प्रेक्षकांनी जरी तो चित्रपट नाकारला असला तरी हिंदी चित्रपट तंत्रज्ञानाला एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचे काम चित्रपटाने केले होते.

अद्याप तरी दुसºया ‘रा.वन’ची कथा तयार नाही. योग्य कथा मिळाल्यास आपण जरूर तसा चित्रपट बनवणार आणि यावेळी अधिक चांगल्या प्रकारे काम करणार, असा त्याने विश्वास व्यक्त केला.

किंग खान तुला आमच्याकडून अ‍ॅडव्हॅन्समध्ये शुभेच्छा.

Web Title: Shahrukh Khan's 'Raavan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.