सलमानसोबत एकही सिनेमा नाही, पण शाहरुखची फेव्हरेट आहे दीपिका पादुकोण, पण का? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 11:07 IST2025-01-05T11:05:33+5:302025-01-05T11:07:50+5:30
दीपिकानं अद्याप बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केलेली नाही.

सलमानसोबत एकही सिनेमा नाही, पण शाहरुखची फेव्हरेट आहे दीपिका पादुकोण, पण का? वाचा...
Deepika Padukone : दीपिका पादुकोण एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर तिनं मोठं यश मिळवलं आहे. एकापेक्षा हीट सिनेमे तिनं बॉलिवूडला दिले आहेत. आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या दीपिकानं अद्याप मात्र बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केलेली नाही. दीपिका सलमानसोबत कधीच पडद्यावर दिसली नाही, याचं कारण काय? तसेच, शाहरुख तिला वारंवार त्याच्या चित्रपटांमध्ये का कास्ट करतो? हे जाणून घेऊया.
दीपिका पादुकोणसोबत चित्रपटात काम करण्याची सलमान खानची इच्छा होती. जेव्हा दीपिका मॉडेलिंग करायची, तेव्हा सलमानने तिला आपल्या चित्रपटाची ऑफर दिली होती. तेव्हा दीपिकाची फिल्म इंडस्ट्रीत येण्याची इच्छा नव्हती. पण, त्यानंतर दोन वर्षांनी दीपिका पादुकोणने किंग खान शाहरुखच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतरही अनेकवेळा सलमान खान याने दीपिका पादुकोणला आपल्या चित्रपटांची ऑफर दिली होती. पण, त्या भुमिका तिच्या पसंतीस पडल्या नाहीत.
सलमान आणि दीपिका पादुकोण एका चित्रपटात काम करू शकतात, असा योगायोग कधीच आला नाही. सलमान खानच्या अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्यानंतरही दीपिकाची त्याच्यासोबत खूप चांगली आहे. दीपिका सलमान खानचा खूप आदर करते. तर शाहरुखसोबत जास्त सिनेमे करण्याचं कारण म्हणजे, तिनं बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात त्याच्यासोबत केली होती. दोघे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. 'पठाण' आणि 'जवान' हे अलीकडचे चित्रपट आहेत, ज्यात दीपिका आणि शाहरुखची जोडी दिसली होती. काजोलनंतर प्रेक्षक शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणला पडद्यावर पसंत करतात. या दोघांचे बहुतांश चित्रपट हिट ठरले आहेत.