'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये अखेर शाहरुख खानचे 'ते' स्वप्न झालं पुर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 19:37 IST2023-12-06T19:35:37+5:302023-12-06T19:37:35+5:30

शाहरुखची लाडकी लेक सुहानाचा 'द आर्चीज' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shahrukh Khan's dream finally came true in premiere of The Archies | 'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये अखेर शाहरुख खानचे 'ते' स्वप्न झालं पुर्ण

'द आर्चीज'च्या प्रीमियरमध्ये अखेर शाहरुख खानचे 'ते' स्वप्न झालं पुर्ण

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला कोणत्याची ओळखीची गरज नाही, देशचं नाही तर जगभरात किंग खानचे चाहते आहेत. शाहरुखने आतापर्यंत असंख्य सिनेमांमध्ये काम केलं. त्याच्या प्रत्येक सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. रोमान्सचा बादशहा असणाऱ्या शाहरुखचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहेत. पण, गेल्या काही वर्षांपासून शाहरुखचे एक स्वप्न अपुर्ण राहिलं होतं. ते आता पुर्ण झालं आहे. तर कोणत आहे ते स्वप्न आपण जाणून घेऊयात.

शाहरुखची लाडकी लेक सुहानाचा  'द आर्चीज' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुहाना 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सुहानाच्या 'द आर्चीज' या सिनेमाचा नुकताच मुंबईत ग्रँड प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. 'द आर्चीज'च्या प्रीमियरला शाहरुख खान लेक सुहानाला सपोर्ट करताना दिसून आला.'

शाहरुख मुलगी सुहानाचा हात धरून कार्पेटवर चालताना दिसला. यावेळी सुहाना लाल रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये दिसली. यातच शाहरुखचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने मुलगी सुहानाबद्दल एख खास इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, 'खर सांगू, माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही आहे. मला ती माझ्यासोबत इथे असावी अशी माझी इच्छा होती. लाल गाऊनमध्ये ती माझ्यासोबत रेड कार्पेटवर चालावी अशी इच्छा होती. पण सध्या तिची प्रकृती ठीक नाही'. आता अखेर शाहरुखचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. 

सुहानाच्या 'द आर्चीज' या सिनेमाचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं आहे.  'द आर्चीज' हा सिनेमा 7 डिसेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सुहानाचा अभिनय पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर शाहरुखच्या नुकतेच प्रदर्शित झालेल्या 'जवान' चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले. आता शाहरुख 'डंकी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Web Title: Shahrukh Khan's dream finally came true in premiere of The Archies