शाहरुख खानच्या या अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, बिकनी फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:39 IST2022-01-03T14:38:34+5:302022-01-03T14:39:53+5:30

रुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेला किंग खान शाहरुख (shahrukh khan)चा चक दे इंडिया हा सिनेमा तुमच्या लक्षात असेलच.

Shahrukh khans chak de india co star vidya malvade share her bikini photos | शाहरुख खानच्या या अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, बिकनी फोटो व्हायरल

शाहरुख खानच्या या अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, बिकनी फोटो व्हायरल

रुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेला किंग खान शाहरुख (shahrukh khan)चा चक दे इंडिया हा सिनेमा तुमच्या लक्षात असेलच. सिनेमात महिला हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवलं होतं अभिनेत्री विद्या माळवदे (Vidya Malvade)ने.मराठमोळी अभिनेत्री असलेल्या विद्यावर या भूमिकेनंतर कौतुकाचा वर्षाव झाला होता. चक दे सिनेमाच्या यशानंतर विद्याने मॉडेलिंग आणि हिंदीत काम सुरु ठेवलं.

विद्या (Vidya Malvade)तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. विद्याने तिचे बोल्ड फोटो  शेअर केले आहेत. तिने इंस्टाग्रामवर बिकनी फोटो शेअर केले आहेत. विद्याचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. आता तिचे बिकनी फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये विद्या माळवदे बीचवर बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटोंमध्ये विद्या समुद्रकिनारी लाटांशी खेळताना दिसत आहे.

तिच्या या बोल्ड आणि हॉट बिकनी फोटोंवर चाहते कमेंट करतायेत. सुपर हॉट, गॉर्जिअस, सेक्सी असे कमेंट चाहते विद्याच्या फोटोवर करतायेत. ​चित्रपटात येण्यापूर्वी ती एअर होस्टेस होती. ती अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. विक्रम भट्ट यांच्या 'इंतेहा' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.

​'चक दे ​​इंडिया'नंतर विद्या माळवदेने 'किडनॅप', 'नो प्रॉब्लेम' आणि 'स्ट्रायकर'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.  ती 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती.
 

Web Title: Shahrukh khans chak de india co star vidya malvade share her bikini photos